‘त्या’ नहर बांधकामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:32 PM2018-02-09T22:32:01+5:302018-02-09T22:32:32+5:30
पाटबंधारे विभागाच्या मार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या कामात अनियमितता होत असल्याचे शंका वर्तविण्यात आलेली होती.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : पाटबंधारे विभागाच्या मार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या कामात अनियमितता होत असल्याचे शंका वर्तविण्यात आलेली होती. त्याचेच भाग म्हणून ८ फेब्रुवारीला तहसीलदार बालपांडे यांनी कामाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
चांदपूर जलाशयाला जोडल्या असलेल्या रनेरा ते कर्कापूर दरम्यानच्या २ किमी अंतराचे नहर तयार करण्याचे कामे युध्दस्तरावर सुरु आहे. त्या कामाचे अंदाजित रक्कम ४१ लक्ष रुपये आहे. सदर कामाची सुरुवात गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेली होती. दरम्यान नहराच्या कामात मुरुम पसरविण्याचे काम हे २०१७ च्या मार्च महिन्यात पुर्ण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदाराकडुन मिळाली आहे. नगर बांधकामाकरिता रनेरा येथील तलाव परिसरातुन २०० ब्रास मुरुम उत्खनन करण्याची परवानगी २०१७ मध्ये देण्यात आली होती.
त्या कामाकरिता मुरुमाचे उत्खनन कंत्राटदाराने परवानगीच्या ठिकाणाहून न करता हरदोली येथील स्थानिक शेतकºयाच्या शेतातून केले असल्याची शाब्दीक तक्रार येथील सरंपचानी केली आहे.
सध्या त्या नहराच्या सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. तयार करण्यात येत असलेले नहर हरदोली येथील मुख्य वितरिकेतून बायपास करुन तयार करण्यात येत आहे. हरदोलीचे सरपंच नितीन गणवीर यांच्या माहितीप्रमाणे त्या नहर कामात वापरण्यात आलेले मुरुम हे गावातील शेतकºयांच्या शेतजमीनीतून खनन केले असल्याची तोंडी तक्रार केली आहे. मुरुम पसरविण्याचे काम होऊन एक वर्षाचा कालावधी झालेला असून वापरण्यात आलेले गौण खनीज नेमक्या कोणत्या ठिकाणाहून खनन करण्यात आले, यावर चौकशी केली जाणार असल्याचे तहसीलदार बालपांडे यांनी सांगितले. पाहणी दरम्यान कंत्राटदाराने मुरुम उत्खननाचे राजस्व भरल्याबाबतचे चालान प्रस्तुत केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे तहसीलदार गजेंद्र बालपांडे तथा तलाठी, मंडळ अधिकाºयांची चमु व पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता हटवार यांनी गुरुवारला कामाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. दरम्यान मुरुमाच्या केलेल्या कामाला एक वर्षाचा कालावधी लोटला असुन त्या कालावधीदरम्यान रनेरा येथील तलावाचे लिज अनेकदा देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
नहर बांधकामात वापरण्यात आलेल्या मुरुमाचे राजस्व कंत्राटदाराने भरल्याचे चालन प्राप्त झाले आहे. मुरुम उत्खनन नेमक्या कोणत्या ठिकाणाहून केले आहे. यावर चौकशी अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल.
- गजेंद्र बालपांडे
तहसीलदार तुमसर