शौचालय नसल्याने उमेदवारी अर्ज रद्द करा

By admin | Published: July 18, 2015 12:38 AM2015-07-18T00:38:11+5:302015-07-18T00:38:11+5:30

घरी शौचालय नसतानाही, ग्रामसेवकाने दिलेल्या प्रमाणपत्राचा खोटा आधार घेऊन लोहारा येथील भारत शिंदे यांनी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

Cancel the application for candidature because there is no toilet | शौचालय नसल्याने उमेदवारी अर्ज रद्द करा

शौचालय नसल्याने उमेदवारी अर्ज रद्द करा

Next

लोहारीतील प्रकरण : ग्रामस्थांची तक्रार
जवाहरनगर : घरी शौचालय नसतानाही, ग्रामसेवकाने दिलेल्या प्रमाणपत्राचा खोटा आधार घेऊन लोहारा येथील भारत शिंदे यांनी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यांच्याकडे शौचालय नसल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा, अशा मागणीचे निवदेन निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक २५ जुलैला होऊ घातली आहे. भंडारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोंढीसाठी लोहारा येथील भारत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मात्र, त्यांच्याकडे शौचालय नाही. त्यामुळे ग्रामसेवकांनी दिलेल्या प्रमाणपत्राचा चुकीचा वापर करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो रद्द करावा, अशी मागणी पेवढा येथील सुरेश मेश्राम, चंद्रभान हटवार, दिलीप वंजारी, हनुमान वंजारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

भारत शिंदे यांच्या अर्जावर आक्षेप प्राप्त झाला. गट ग्रामपंचायत कोंढी येथील प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीच्यावेळी मूळ अर्जासोबत ग्रामविस्तार अधिकारी यांनी दिलेला शौचालय असल्याचा दाखला जोडलेला आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकृत करण्यात आला.
- प्रमोद हुमणे
निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा


शिंदे हे लोहारा येथील रहिवासी असून १३ जुलै रोजी चौकशी केली असता घराला लागून मालकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे अर्जदार शेजारी असलेल्या जयवंता शिंदे यांच्या शौचालयाचा वापर करीत आहे. स्वत:च्या मालकीचे शौचालय उपलब्ध नाही.
- एन. सी. बिसेन
ग्रामविकास अधिकारी
गट ग्रामपचांयत कोंढा

Web Title: Cancel the application for candidature because there is no toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.