उत्तराधिकार कायदा उपसमिती रद्द करा
By admin | Published: August 20, 2016 12:28 AM2016-08-20T00:28:38+5:302016-08-20T00:28:38+5:30
महाराष्ट्र शासनाकडून घोषित विवाह व उत्तराधिकार कायदा करण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली
राज्यपालांना निवेदन : बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाची मागणी
भंडारा : महाराष्ट्र शासनाकडून घोषित विवाह व उत्तराधिकार कायदा करण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली. त्या उपसमितीला तत्काळ रद्द करण्याची मागणी द रजिस्टर्ड े प्रांतिय अध्यक्ष किशोर बौध्द व भंडारा जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी डांगे यांच्यामार्फत महामहिम राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र शासनाद्वारे बौध्द विवाह व उत्तराधिकार कायदा तयार करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठीत केली. या समितीतील सर्व सदस्यगण हे गैर बुध्दीस्ट असुन हिंदु धर्मिय आहेत.
भारतात सर्व राज्यामध्ये पंजीकृत बौध्द लोक राहतात. त्या प्रत्येक राज्याच्या अनुसार त्यांची विविध बोलीभाषा आहेत. पंरतु हे सर्व लोक आपल्या सामाजिक तथा धार्मिक व्यवहार बौध्द पध्दतीने करतात. या लोकांनी स्वत:ला विधीवत बौध्द घोषित केलेले आहेत. त्याच्या शासकीय व अर्थशासकीय रेकार्डमध्ये बौध्द म्हणून नोदं केलेली आहे.
जे अल्पसंख्याक वर्गात मोडतात. त्यांना पंजीकृत बौध्द असे संबोधिली जाते. त्यामुळे बौध्दांचे कायदे फक्त बौध्दांकरिताच प्रास्तावित व्हावेत अशी मागणी द रजिस्टर्ड बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियानी केलेली आहे.
तसेच ज्या लोकांना बौध्द धर्माची जाणीव नाही फक्त वरकरनी बौध्द दाखवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेच्या संवैधानिक देशात लेखी रेकार्डमध्ये बौध्द म्हणून कोणाचीही नोंद शासन दरबारात नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनानी घोषित बौध्द विवाह व उत्तराधिकार कायदा करण्यासाठी गठीत उपसमिती तत्काळ रद्द करावे. ज्यामुळे भारतातील बौध्दांचे मन दुखणार नाही, याची नोंद घ्यावी, अन्यथा द रजिस्टर्ड बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वतीने तीव्र अांदोलन करण्यात येईल. सोबतच शासनावर कायदेशीर कार्यवाही सुध्दा करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून दिला आहे.
अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी प्रामुख्याने द रजिस्टर्ड बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे प्रांतीय अध्यक्ष किशोर बौध्द, जिल्हयाचे अध्यक्ष विवेक बौध्द, सचिव रवि बौध्द, प्रांतीय सचिव बाबुलाल बौध्द, चेतन बौध्द गडचिरोली, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष उध्दवराव बौध्द, पटीसेन बौध्द, इंदल बौध्द, डॉ. अशोकांत बौध्द, मित्रसेन बौध्द जाम, हरिदास बौध्द, प्रदीप बौध्द, मुनेश्वर बौध्द यांच्यासह बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)