बीटीबीची जमीन रद्द करून महिला रुग्णालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 12:31 AM2016-08-25T00:31:47+5:302016-08-25T00:31:47+5:30

भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात बीटीबी कंपनीला मिळालेली...

Cancellation of BTB land and start a women hospital | बीटीबीची जमीन रद्द करून महिला रुग्णालय सुरू करा

बीटीबीची जमीन रद्द करून महिला रुग्णालय सुरू करा

Next

शहर काँग्रेस कमिटीचा आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन 
भंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात बीटीबी कंपनीला मिळालेली जागा त्वरित रद्द करून महिला रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा येथील जलशुद्धीकरण केंद्रा लगतची प्लॉट क्रमांक २०/४ एकूण एरिया १६८३३.२ चौ.मी. ही जागा नगर परिषद भंडारा यांनी स्थानिक ठराव घेवून अधिकार नसताना ग्रीन झोन मधील व भंडारा शहर फिल्टर केंद्राला लागून तसेच मुख्य मेन रोड, शासकीय रुग्णालय व मुख्य रस्त्यावर असलेली मौक्यावरची जागा बीटीबी कंपनी यांना देण्यात आली. याचा विरोध भंडारावासीयांनी केल्यानंतर शासनाने कार्यवाही केल्यामुळे सदरचे बांधकाम थांबविण्यात आले होते. तसे आदेश गैरअर्जदार व नगर परिषद भंडारा यांना कळविण्यात आले होते.
बीटीबी कंपनी गैरअर्जदार यांनी स्टे असतानी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून विकसीत कामे सुरू केली. सदर कृत्य चूकीचे असून नगर परिषद भंडाराचे अधिकारी व पदाधिकारी सत्तापक्ष राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टी यांच्या हेतुपुरस्पर संगणमताने सत्तेचा दुरूपयोग करून कोट्यवधींची जागा बीटीबी कंपनीला नफ्याच्या दृष्टीकोनातून देण्यात आली. सदर मंडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ लागून असल्याने अस्वच्छतेमुळे तसेच येथील पाणीपुरवठा संपूर्ण भंडारावासीयांना होत असून याचा दुष्परिणाम जनतेच्या आरोग्यावर होऊ शकतो. याकरिता गैरअर्जदार कंपनीने प्रदूषण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. पाणी केंद्र व परिसर प्रदूषीत होणार नाही, याची हमी कोणी घ्यावी हा प्रश्न संपूर्ण शहराला चिंतेचा विषय ठरला आहे.
सदर मंडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ लागून असल्याने अस्वच्छतेमुळे तसेच येथील पाणीपुरवठा संपूर्ण भंडारावासीयांना होत असून याचा दुष्परिणाम जनतेच्या आरोग्यावर होऊ शकतो. गैरअर्जदार कंपनीने प्रदूषण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. पाणी केंद्र व परिसर प्रदूषित होणार नाही, याची हमी कोणी घ्यावी हा प्रश्न संपूर्ण शहराला चिंतेचा विषय ठरला आहे.
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्याला दोन दोन खासदार लाभले असून जनतेचे पदर अजुन रिकामे आहे. दोन्हीही खासदार मुंग गिळून बसले आहेत. महिला रुग्णालयाच्या प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. भंडारा जिल्ह्याचे शिवसेनेचे पालकमंत्री हे आरोग्य मंत्री असूनसुद्धा जिल्ह्यातील महिलांकरिता महिला रुग्णालयासाठी काहीच करीत नाही. यावरून यांची जिल्ह्यातील आरोग्यविषयीची तत्परता दिसून येत आहे. महिला सक्षमीकरणाचे आणि सक्षम आरोग्याचे आश्वासन फोल ठरलेले दिसते तसेच हास्यास्पद व निंदनिय आहे.
जेव्हापर्यंत महिला रुग्णालयाची जागा आवंटीत करून रुग्णालयाच्या कामाला सुरूवात होत नाही तोपर्यंत आरोग्य विभागाचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांना भंडारा शहरात प्रवेश देण्यात येणार नाही, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला. सदर जागा महिला रुग्णालयाकरीताच देण्यात यावी अन्यथा महिला रुग्णालयाला न दिल्यास भंडारा शहर काँग्रेस कमिटी जनतेसोबत रस्त्यावर उतरून महिला रुग्णालयासाठी लढा देईल व आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, अनु. जाती जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, जि.प. सदस्य निलकंठ कायते, प्रविण भोंदे, शर्मिल बोदेले, जनार्धन निंबार्ते, मंगेश हुमणे, संदेश शामकुवर, विलास मोथरकर, दिलीप गायधने, विनीत देशपांडे, सुरेश होलघरे, द्वारकानाथ गोंडाणे, विजय भुरे, अंकुश वंजारी, शंकर लांबट, शालीक भुरे, लक्ष्मीकांत साकुरे, राधेश्याम गायधने, कुंदा वाघाडे, निता नागफासे, गजानन मोहरकर, रविंद्र चोपकर, मुलचंद ईश्वरकर, शिला कांबळे, प्रदिप ईश्वरकर, महेंद्र कांबळे, पराग खोब्रागडे, घनश्याम भांडारकर, सुरेश गोन्नाडे, अखिल तिवाडे, विपुल खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Cancellation of BTB land and start a women hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.