शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी

By Admin | Published: June 18, 2017 12:26 AM2017-06-18T00:26:45+5:302017-06-18T00:26:45+5:30

राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने ...

Cancellation of Teacher Transfer Process | शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी

शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी

googlenewsNext

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक कृती समितीचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने अनेकांवर ती अन्यायकारक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिक्षक कृती समिती भंडाराच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी सर्वसाधारण शिक्षक बदलीसाठी घेतलेला शासनाने निर्णय स्थगीत करावा यासह अनेक मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्यांमध्ये शिक्षकांचे पगार १ तारेखेला करावे, २००५ नंतर लागलेल्या प्राथमिक शिक्षकांना पेंशन लागू करावी, पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व पदविधर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी, ग्रेड वेतन लागू करावे, जिल्ह्यातील सर्व शाळांना संगणकीकृत करून नेट जोडणी करावी, जि.प. शाळांचे विद्युत बिल शासनाने भरावे, केंद्राची पुनर्रचना करून केंद्र प्रमुखांची पदे प्राथमिक विषय शिक्षकांमधून भरावे, चार टक्के सादील खर्चाची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा करावी, विद्यार्थ्यांना गणवेशाकरिता ५०० रूपये द्यावे, मुलींचा उपस्थिती भत्ता १० रूपये करावा, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्यांचे मानधन पाच हजार रूपये करावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्यावेळी कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, केशव बुरडे, महेश गावंडे, प्रमोद घमे, संदीप वडीले, किशोर ईश्वरकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, मुकूंद ठवकर आदींचा समावेश होता.

Web Title: Cancellation of Teacher Transfer Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.