लाखनी येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:04+5:302021-02-14T04:33:04+5:30
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रतिभा राजहंस, माजी जि.प. सदस्य दामाजी खंडाईत, ॲड. शफी लद्धानी, डॉ. विकास गभणे, नगरसेवक ...
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रतिभा राजहंस, माजी जि.प. सदस्य दामाजी खंडाईत, ॲड. शफी लद्धानी, डॉ. विकास गभणे, नगरसेवक धनू व्यास, शिवानी काटकर, डॉ. मनोज आगलावे उपस्थित होते. अयोग्य जीवनशैली, पर्यावरण प्रदूषण यामुळे जनुकीय बदल होऊन मानवी कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे १ लक्ष २५ हजार प्रकरणे समोर येतात. ६७ हजार मृत्यू होत असल्याची माहिती डॉ. आगलावे यांनी दिली. डॉ. प्रिया गणेश कुमार यांनी वैयक्तिक स्वच्छता, पॅप टेस्ट, काॅन्पोस्कोप तपासणी लसीकरणामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी करता येईल, अशी माहिती दिली. कार्यक्रमासाठी बाळकृष्ण आगलावे, डॉ. दीपक आगलावे, पंकज खंडाईत, सुमित्रा खंडाईत, वंदना आगलावे यांनी सहकार्य केले.