उमेदवारांची पहिली पसंती परंपरागत चिन्हांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:21+5:302021-01-08T05:55:21+5:30
चिन्ह वाटप करताना तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीच्या क्रमानुसार उमेदवारांना बाेलाविले जात हाेते. त्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांना बाेलावून त्यांच्या चिन्हाची पसंती नाेंदवून ...
चिन्ह वाटप करताना तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीच्या क्रमानुसार उमेदवारांना बाेलाविले जात हाेते. त्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांना बाेलावून त्यांच्या चिन्हाची पसंती नाेंदवून चिन्हाचे वाटप केले जात हाेते. विशेष म्हणजे निवडणूक अर्ज सादर करताना पसंतीचे पाच चिन्हे नाेंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले हाेते. त्यामुळे या पाच चिन्हांतून उमेदवारांनी आपले बाेधचिन्ह निवडले. त्यामुळे एकाच चिन्हावर अनेकांच्या उड्या पडण्याचे चिन्ह काेणत्याही तहसील कार्यालयात दिसून आले नाही. आता मंगळवारपासून गावागावांत या चिन्हांचा घाेष करून मते मागितली जाणार आहे.
बाॅक्स
निवडणुकीपुढे काेराेनाचे भय संपले !
उमेदवारी मागे घेणे आणि निवडणूक चिन्ह वाटपामुळे सातही तहसील कार्यालयांत प्रचंड गर्दी झाली हाेती. काेराेना संसर्गाचे भयही निवडणुकीपुढे संपल्याचे दिसत हाेते. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत अनेकांनी मास्कही लावले नव्हते. प्रत्येकजण तावातावाने निवडणुकीच्या चर्चा करत हाेते. तहसील कार्यालयाच्या आवारात गटागटांने चर्चा रंगल्या हाेत्या. सरपंचांचे आरक्षण निवडणुकीनंतर काढले जाणार असल्याचे अनेक अपक्षांनी उमेदवारी दाखल केली आहे. गावपुढाऱ्यांनी त्यांची मनधरणी करूनही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी माघार घेतली नाही.