साथीच्या आजारांची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:52+5:302021-08-14T04:40:52+5:30

पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून तसेच शुद्धीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन गोळ्या किंवा ...

Care must be taken to prevent the spread of contagious diseases | साथीच्या आजारांची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक

साथीच्या आजारांची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक

Next

पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून तसेच शुद्धीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन गोळ्या किंवा द्रावण वापरावे. जेवणापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. जुलाब झाल्यास ओआरएस पाकिटे शासकीय, निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत. तसेच ताक, डाळीचे पाणी किंवा भाताची पेज इत्यादी भरपूर प्रमाणात घ्यावेत. ताजे अन्नपदार्थांचे सेवन करावे.

कीटकजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी गावात असलेले निरूपयोगी वस्तू (निकामी टायर्स, फुटकी भांडी इत्यादी) या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. नागरिकांनी प्रामुख्याने घराच्या परिसरात, गुरांच्या गोठ्यात नियमित स्वच्छता करावी. शेणाचे खड्डे किंवा शेणखत गावापासून दूर राहतील याची खबरदारी घ्यावी. कीटकांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा तसेच झोपतांना शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल असे कपडे वापरावेत. ताप आल्यास दुर्लक्ष करू नये व त्वरित दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Care must be taken to prevent the spread of contagious diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.