काेराेना रुग्ण नीचांकी पातळीवर; केवळ चार पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:35+5:302021-06-11T04:24:35+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४९८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ३३२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये ...
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४९८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ३३२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये भंडारा तालुक्यात २४ हजार ६७४, माेहाडी ४३४८, तुमसर ७१११, पवनी ६००४, लाखनी ६५२८, साकाेली ७६५१ आणि लाखांदूर तालुक्यातील २९१६ रुग्णांचा समावेश आहे. तर ५७ हजार ७१० व्यक्तींनी काेराेनावर मात केली. त्यात भंडारा तालुक्यातील २४१०८, माेहाडी ४२२२, तुमसर ६९६५, पवनी ५८८४, लाखनी ६४०३, साकाेली ७२७९, लाखांदूर २८४९ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या ४६७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, भंडारा तालुक्यात ७४, माेहाडी ३१, तुमसर २७, पवनी १६, लाखनी ३०, साकाेली २७१, लाखांदूर १८ रुग्णांचा समावेश आहे.
बाॅक्स
पाच तालुके निरंक
गुरुवारी माेहाडी, तुमसर, पवनी, साकाेली आणि लाखांदूर तालुक्यात काेराेना रुग्णाची नाेंद झाली नाही. गत काही दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या अचानक वाढली हाेती; मात्र आता तेथील परिस्थितीही पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात गुरुवारी काेराेना मृत्यूची नाेंद झाली नाही. गत दहा दिवसात केवळ एका व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यूदर १.७८ टक्के आहे.