चालक-वाहकांनी केले मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:25 AM2017-10-21T00:25:25+5:302017-10-21T00:25:43+5:30
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोेग लागू करण्यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोेग लागू करण्यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनांतर्गत चालक व वाहकांनी शुक्रवारी साम्ूुहिक मुंडण करून मागण्यांची पुर्तता होईपर्यंत संघटना संप मागे घेणार नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केली.
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त बसफेºया रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे रापनिला कोट्यवधी रूपयांचा फटका बसत असल्याची माहिती आहे. संपामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट असून तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुसरीकडे या संपामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवाळीचा सण आटोपताच कर्तव्याच्या ठिकाणी परत जाण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व खाजगी कंपनीच्या अधिकाºयांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गर्दी असते. परंतू एसटीच्या संपामुळे रेल्वे सेवेकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. दुसरीकडे खाजगी वाहनधारकांची चांदी झाली आहे. मागण्यांमध्ये एस.टी. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, १ जुलै २०१६ पासून देय होणारा सात टक्के महागाई भत्ता व जानेवारी २०१७ पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करावा, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, १ एप्रिल २०१६ पासून हंगामी वाढ लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला ५०० रूपये याप्रमाणे वर्षभर मोफत पास देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.