रानगव्याच्या शिकार प्रकरणातील आरोपी वनविभागाला सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:53 PM2018-06-02T21:53:21+5:302018-06-02T21:53:21+5:30

वनकार्यालय साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगल शिवारात दहा दिवसांपुर्वी एका रानगव्याची शिकार करून फेकण्यात आले. घटनेला तब्बल दहा दिवस उलटले तरी वनविभाग शिकारी व या प्रकरणात वापरण्यात आलेले ट्रॅक्टरचा शोध लावू शकले नाही. त्यामुळे हे शिकारी वनविभाला सापडतील किंवा नाही यात शंका आहे.

In the case of Rongwei hunting case, the accused can not find the forest department | रानगव्याच्या शिकार प्रकरणातील आरोपी वनविभागाला सापडेना

रानगव्याच्या शिकार प्रकरणातील आरोपी वनविभागाला सापडेना

Next
ठळक मुद्देतपास कासवगतीने : घटनेतील वाहनाचाही पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : वनकार्यालय साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगल शिवारात दहा दिवसांपुर्वी एका रानगव्याची शिकार करून फेकण्यात आले. घटनेला तब्बल दहा दिवस उलटले तरी वनविभाग शिकारी व या प्रकरणात वापरण्यात आलेले ट्रॅक्टरचा शोध लावू शकले नाही. त्यामुळे हे शिकारी वनविभाला सापडतील किंवा नाही यात शंका आहे.
साकोली वनविभाअंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगल शिवारात २४ मे ला रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांना एक रानगवा जंगलात मृतावस्थेत दिसला. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभाग घटनास्थळावर दाखल झाले.
त्यावेळी विद्युत प्रवाहाच्या सहासाने एका रानगव्याला करंट लावून ट्रॅक्टरच्या सहायाने घटनास्थळावर आणून फेकल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाने सदर रानगव्याचे पशुवैद्यकीय अधिकाºयाच्या हाताने शवविच्छेदन करून रानगव्याला जंगलातच पूरले.
या प्रकरणाची चर्चा परिसरात वाºयासारखी पसरली. वनविभागाने आपली पथके चारही बाजुने शिकाºयांच्या शोधात पाठविली. मात्र दहा दिवसाचा कालावधी लोटला तरी शिकारी व ट्रॅक्टरचा शोध लागलेला नाही.
आरोपींचा शोध वनविभागाला विलंब लागत असून कासवगतीने तपास होत आहे, हे मात्र विशेष.

सदर शिकारी प्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टरची माहिती देणाºयास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणाºयाचे नावीह गोपनीय ठेवण्यात येणार आहे. घटनेचा तपास सुरूच आहे.
-आरती उईके, वनक्षेत्राधिकारी साकोली.

Web Title: In the case of Rongwei hunting case, the accused can not find the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.