वृक्ष लागवड प्रकरणात मुख्य वनसंरक्षक चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:49 AM2019-08-07T00:49:49+5:302019-08-07T00:50:35+5:30

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवड करताना शासकीय नियमांना डावलून वृक्ष लागवड करण्यात आली. गाळयुक्त माती व शेणखत न घालता येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. तुमसर वनपरिक्षेत्रातील वृक्ष लागवडीतील गौडबंगाल या आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले.

In the case of tree planting, the Chief Forester will investigate | वृक्ष लागवड प्रकरणात मुख्य वनसंरक्षक चौकशी करणार

वृक्ष लागवड प्रकरणात मुख्य वनसंरक्षक चौकशी करणार

Next
ठळक मुद्देकार्यासन अधिकाऱ्यांचे पत्र : तुमसर वनपरिक्षेत्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवड करताना शासकीय नियमांना डावलून वृक्ष लागवड करण्यात आली. गाळयुक्त माती व शेणखत न घालता येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. तुमसर वनपरिक्षेत्रातील वृक्ष लागवडीतील गौडबंगाल या आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते डॉ.पंकज कारेमोरे यांनी वनविभागाचे सचिवांना केली होती. त्याची दखल घेण्यात आली असून मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत ३ लक्ष २८ हजार वृक्षांची लागवडीकरिता आतापर्यंत ६ कोटी खर्च करण्यात आले आहे. शासनाकडून १५ लक्ष मंजूर करण्यात आले आहे. वृक्ष लागवड करण्याच्या नियमानुसार गाळयुक्त माती व शेणखताचा वापर करणे अनिवार्य आहे. परंतु येथे त्याला फाटा देण्यात आला. खड्ड्यात काळी माती घालण्यात आली तर शेणखताचा वापर काही ठिाकणी करण्यात आला आहे. शेणखत उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. येथे ८ लक्ष २३ हजार वृक्ष लागवडीकरिता १३ कोटी रुपये मंज़ूर करण्यात आले आहे.
डॉ.पंकज कारेमोरे यांनी ‘आपले सरकारवर पोर्टल’वर अर्ज वनमंत्रालयाकडे पाठविला होता. संबंधित विभागाचे कार्यासन अधिकारी दामोधर दळवी यांनी सदर तक्रारीची चौकशी करिता मुख्य वनसंरक्षक यांना निर्देश दिले आहे.
पत्रात सामान्य विभागाकडे आलेल्या तक्रारीवर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी तात्काळ कार्यवाही करून तक्रारकर्त्यास पाठवून प्रत शासनाकडे पाठविण्यात यावी असे नमूद केले आहे. प्रकरणात चौकशी दरम्यान काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तुमसर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीत गौडबंगाल प्रकरणी राज्याच्या महसूल व वनविभागाकडे आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली होती. त्या अनुषंगाने कार्यासन अधिकारी दामोधर दळवी यांनी सदर तक्रारीची चौकशी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर हे करणार असल्याचे पत्र पाठविले आहे.
-डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते, तुमसर

Web Title: In the case of tree planting, the Chief Forester will investigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.