कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:00+5:302021-03-20T04:35:00+5:30
या बैठकीला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश मेंढे, पशुधन विकास अधिकारी एस. बी. वाघाये, सहायक प्रशासन अधिकारी एच. व्ही. गौतम, ...
या बैठकीला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश मेंढे, पशुधन विकास अधिकारी एस. बी. वाघाये, सहायक प्रशासन अधिकारी एच. व्ही. गौतम, विस्तार अधिकारी एच. टी. निमजे, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बागडे उपस्थित होते.
यावेळी कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांची दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करण्यात यावी, सातव्या वेतन आयोगान्वये अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आश्वासन प्रगती योजनेंतर्गत १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची तीन लाखांची सुधारित प्रगती योजना १ जानेवारी २०१६ पासून लागू करणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्यात यावे, जिल्हा परिषद शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव तसेच सेवापुस्तिका सहावे व सातवे वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत पाठविण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन विक्री अंशराशीकरण राशी त्वरित देण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे उर्वरित सहावे व सातवे वेतन आयोगाचे व सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे व उत्तीर्ण झाल्याचे कार्योत्तर परवानगी अर्ज व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अविलंब, सेवानिवृत्ती फाईल्स त्वरित जिल्हा परिषदेला पाठविण्यात याव्या, आदी मागण्या करण्यात आल्या.
खुणे यांनी महासंघाच्या समस्या व मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे तालुकाध्यक्ष होमेंद्र शहारे, सुंदरलाल नंदेश्वर, व्ही. जे. मडावी, अनिल कसारे, ए. पी. गजभिये, के. पी. बंसोड, डी. के. उके, एल. डी. राऊत, एस. डी. राऊत, कर्मचारी के. टी. झिंगरे, के. डी. टेकाम, आर. व्ही. कुंभरे, आर. एस. हटेले, आर. एम. भोयर यांचा समावेश होता.