आशांच्या संपाला कास्ट्राईबचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:27+5:302021-06-18T04:25:27+5:30
गेल्या सात वर्षांपासून आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक अल्प मानधनावर आराेग्य विभागाचे काम पार पाडीत आहे. गत दाेन वर्षात काेराेना ...
गेल्या सात वर्षांपासून आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक अल्प मानधनावर आराेग्य विभागाचे काम पार पाडीत आहे. गत दाेन वर्षात काेराेना काळात स्वत:चा जीव धाेक्यात घालून कर्तव्य निभावले आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा माेलाचा वाटा आहे.
मात्र तरीही शासनाकडून दुर्लक्षित केले आहे. यासाठी संपूर्ण राज्यभरात सुरु असलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाच्या आंदाेलनाला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आराेग्य मंत्र्यांना पाठविल्याची माहिती महासंघाचे उप महासचिव सूर्यभान हुमणे यांनी दिली. यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन केले.
शासनाने न्याय द्यावा अशी मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष म.ना. कांबळे यांच्या नेतृत्वात उपमहासचिव सूर्यभान हुमणे, ज्येष्ठ सल्लागार डाॅ. मधुकर रंगारी, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, सचिव हरिचंद्र धांडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय नंदागवळी, डाॅ. तानाजी शिंगाडे, सिद्धार्थ भाेवते, अजय रामटेके, प्रवीण राठाेड, देवानंद नागदेवे, युवराज रामटेके, नंदिनी खराबे, उर्मिला भेंडारक, संंगीता उरकुडे, सविता वाघधरे, साेनू सार्वे, मनिषा नगरकर, रत्नकला रहांगडाले, सरिता जेठे, ज्याेती चाैधरी, ज्याेती बावने यांनी केली आहे.