रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:24+5:302021-05-24T04:34:24+5:30
२३ लोक १४ तुमसर: तालुक्यातील गोबरवाही पोलिसानी बावनथडी नदी पात्रातून रोहणी टोला येथून रेतीची अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टरसह ...
२३ लोक १४
तुमसर: तालुक्यातील गोबरवाही पोलिसानी बावनथडी नदी पात्रातून रोहणी टोला येथून रेतीची अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टरसह चालक व मालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद राखी शेंद्रे (२३), ट्रॅक्टर मालक देवानंद ऊर्फ गुड्डू व्यंकटराव रहांगडाले दोन्ही रा. रोहणी टोला ता तुमसर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
गोबरवाही पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून बावनथडी नदीच्या रोहणी टोला पात्रातून सदर आरोपींनी संगनमत करून ट्रॅक्टर क्र. एमएच ३६ आय ३१९४ मध्ये दीड ब्रास रेती नदी पात्रातून अवैधरीत्या उत्खनन करून विना परवाना घेऊन जात असताना आरोपी विरोधात भादंविचे कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ठाणेदार दीपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार भरत ढाकणे, पोलीस नायक मनोज साकुरे, रवि जायभाये, विष्णू जायभाये, तुषार ढबाले, महेश गिर्हेपुंजे, गणेश बांते यांनी केली. तपास ठाणेदार दीपक पाटील करत आहे.