सावधान एसटीने विनातिकीट प्रवास केल्यास वसूल होणार दुप्पट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:16+5:302021-09-23T04:40:16+5:30
कोट एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, तसेच आपली तिकिटे बसमधून उतरल्यानंतरही जपून ठेवावीत. एसटीतून विनातिकीट ...
कोट
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, तसेच आपली तिकिटे बसमधून उतरल्यानंतरही जपून ठेवावीत. एसटीतून विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास चुकविलेल्या प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा शंभर रुपयांपैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम वसूल करण्यात येईल.
प्रवीण घोल्लर, विभागीय वाहतूक अधीक्षक, भंडारा
बॉक्स
१० ऑक्टोबरपर्यंत चालणार तपासणी मोहीम
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन निर्णयाला प्राधान्य दिले आहे. कोरोना संकटात एसटी महामंडळाने एसटी बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याकाळात एसटीचे लाखोंचे नुकसान झाले होते. मात्र, त्यानंतर संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यांतर्गत, तसेच राज्याबाहेरील एसटी बस धावू लागल्या आहेत. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. विनातिकीट प्रवाशांवर आळा घालण्यासाठी भंडारा विभागात २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रवासी तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे.