भाकपने महागाई विरोधात दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:07 PM2018-06-20T22:07:13+5:302018-06-20T22:07:25+5:30

स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदाराला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी महागाई विरोधी आंदोलनाच्या आवाहनानुसार दि.२० जून ला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीच्या नावे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Cautiously give up against inflation | भाकपने महागाई विरोधात दिले धरणे

भाकपने महागाई विरोधात दिले धरणे

Next
ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या नावे निवेदन : जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त दरात पुरवठा करा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदाराला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी महागाई विरोधी आंदोलनाच्या आवाहनानुसार दि.२० जून ला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीच्या नावे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव हिवराज उके, राज्य कौंसील सदस्य माधवराव बांते, सदानंद इलमे व शांताबाई बावनकर यांचा समावेश होता.
निवेदनात पेट्रोल डिझेलवरील सर्व प्रकारच्या करामध्ये कपात करून किंवा पेट्रोल डिझेलला जीएसटी खाली आणून त्यांचे दर ५० रु. प्रती लिटरच्या खाली आणण्यात यावे, वीज, एसटी बसचे तिकीट दर, रासायनिक खते, कीटकनाशके बियाणे, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गहू, तांदूळ या सह केरोसीन, साखर व इतर जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त दरात पुरवठा करण्यात यावा, घरगुती गॅसचे वाढविलेले दर कमी करून ते २०१४ च्या पातळीवर आणण्यात यावे, त्याचप्रमाणे उज्ज्वला गॅस योजनेवर सबसिडी देण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता.
दरम्यान जिल्हाधिकारी शांतनू गोयल हे बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांनी स्वीकारले. शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मागण्यांमध्ये निराधारांचे चार महिन्यांचे प्रलंबित मानधन पंधवाड्यात देण्यात येईल असे सांगितले.
तसेच राशन कार्ड बनवून देणे, ड यादीत नाव नसल्यास घरकुल बांधून देणे, पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत घरे बांधून देणे, वनहक्क कायद्यांतर्गत प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठविणे आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
धरणे आंदोलनाप्रसंगी झालेल्या सभेत शिवकुमार गणवीर, हिवराज उके, माधवराव बांते, सदानंद इलमे, शांताबाई यांचे मार्गदर्शन झाले.
सदर आंदोलनप्रसंगी जयप्रकाश मसरके, राजू बडोले, माणिकराव कुकडकर, गजानन पाचे, मोहनलाल शिंगाडे, लिलाबाई रामटेके, अल्का सतदेवे, अंजीरा उके, रत्ना इलमे, महानंदा गजभिये, वामनराव चांदेवार, शिशुपाल अटाळकर, मंगेश माटे, ललीता तिजारे, नरेंद्र रामटेके, डी.डी. कानेकर, प्रविण वासनिक, नंदकिशोर रामटेके, गणेश चिचामे, कुसुम राऊत, मोहित देशमुख, ज्ञानीराम नेवारे, गौतम भोयर आदी उपस्थित होते.

Web Title: Cautiously give up against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.