सीबीएसई : तुमसरचा गौरव चांडक अव्वल
By admin | Published: May 26, 2015 12:34 AM2015-05-26T00:34:51+5:302015-05-26T00:34:51+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) निकाल आज घोषित झाला. यात भंडारा जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ६०...
निकाल ६० टक्के : जिल्ह्यात चार शाळा
भंडारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) निकाल आज घोषित झाला. यात भंडारा जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ६० इतकी आहे. तुमसर येथील शिरीनभाई नेत्रावाला विद्यालयाचा विद्यार्थी गौरव चांडक हा ९३.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आला.
सीबीएसईच्या निकालात यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या चार शाळा आहेत. यात केंद्रीय विद्यालय जवाहरनगर, महर्षी विद्या मंदिर बेला (भंडारा), शिरीनभाई नेत्रावाला स्कूल तुमसर आणि सनफ्लॅग स्कूल वरठी या चार शाळांचा समावेश आहे.
या शाळांमधून एकूण ८४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी तुमसरातील गोवर्धन नगरातील रहिवासी तथा शिरीनभाई नेत्रावालाचा विद्यार्थी गौरव चांडक हा जिल्ह्यातून प्रथम आला. सीबोना जांगळे ८९.२ टक्के, राशी अग्रवाल ८४.२ टक्के असे गुणानुक्रमे आले. महर्षी विद्या मंदिरची विद्यार्थिनी वैष्णवी काटेखाये ८१ टक्के घेऊन शाळेतून प्रथम आली. महर्षी शाळेचा निकाल ९० टक्के असल्याचे माहिती प्राचार्य श्रुती ओहळे यांनी ‘लोकमत’ ला दिली. (प्रतिनिधी)