शासकीय दहा रुग्णालयात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:03 AM2019-05-12T01:03:31+5:302019-05-12T01:03:51+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालयासह तीन उपजिल्हा रुग्णालय आणि सहा ग्रामीण रुग्णालयात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ६४ कॅमेरे लावण्यात येणार असल्याने येथील कारभारावर आता तिसऱ्या डोळ्याचा अंकुश राहणार आहे.

CCTV cameras will be required in government hospitals | शासकीय दहा रुग्णालयात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

शासकीय दहा रुग्णालयात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभाग। जिल्हा सामान्य रुग्णालयासह साकोली, पवनी, तुमसरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालयासह तीन उपजिल्हा रुग्णालय आणि सहा ग्रामीण रुग्णालयात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ६४ कॅमेरे लावण्यात येणार असल्याने येथील कारभारावर आता तिसऱ्या डोळ्याचा अंकुश राहणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शासकीय मान्यताही देण्यात आली. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
भंडारा जिल्हा रुग्णालय ४८२ खाटांचे आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याचा भार या रुग्णालयावर आहे. मात्र नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड असते. त्यामुळे आता येथे कॅमेरे लावले जाणार आहेत. सध्या रुग्णालयात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र आता शासनाच्या या निर्णयाने ६४ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. त्यासाठी ६ लाख ४० हजार रुपये अपेक्षित आहे. सदर कॅमेरे मुख्य प्रवेशद्वार, बाह्य रुग्ण विभाग, अपघात कक्ष, अपघात वैद्यकीय अधिकारी कक्ष, सर्जीकल ओपीडी, बालरुग्ण कक्ष, पुरुष आंतररुग्ण विभाग, महिला आंतररुग्ण विभाग, लेबर रुम आवार, शस्त्रक्रिया गृह आवार व इतर आवश्यक ठिकाणी प्रमाणानुसार विविध कक्षामध्ये लावले जाणार आहेत.
तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे असून या ठिकाणी १४ कॅमेरे लावले जाणार आहेत. सिस्टीमसह येथील सीसीटीव्ही कॅमेºयासाठी दोन लाख ४० हजार रुपयांचा खर्च आहे. साकोली आणि पवनी येथील ग्रामीण रुग्णालय प्रत्येकी ५० खाटांचे आहे. त्याठिकाणी प्रत्येकी सहा सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिस्टीम बसविली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यातील अड्याळ, मोहाडी, सिहोरा, लाखांदूर, पालांदूर, लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी एक सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाईल. त्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण रुग्णालयात मुख्य प्रवेशद्वारावर हा कॅमेरा लावला जाणार आहे.

रुग्णसेवा सुधारणार
जिल्ह्यातील दहा शासकीय रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याने आरोग्य सुविधा सुधारण्याची शक्यता आहे. या रुग्णालयात कोण कधी येतो? रुग्णांवर योग्य उपचार होतात की नाही? हे सर्व या कॅमेºयात रेकॉर्ड होणार आहे. जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार होत असले तरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे कायम हाल होतात. डॉक्टर वेळेवर मिळत नाही. रुग्णांना थेट भंडारा अथवा नागपुरला जाण्याचा सल्ला दिला जातो. आता या रुग्णालयात कॅमेरे लागणार असल्याने नियोजित वेळी डॉक्टरांना व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या गावाच्या जवळ आरोग्य सुविधा वेळेत मिळेल. मात्र या कॅमेºयांची देखभाल आणि दुरुस्ती योग्य राखणे तेवढेच गरजेचे आहे.

Web Title: CCTV cameras will be required in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.