तुमसरात डॉक्टरांच्या रक्तदानाने डॉक्टर दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:32+5:302021-07-05T04:22:32+5:30
तुमसर : कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या भीतीने घाबरलेला असताना डॉक्टरांनी मात्र स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अविरत परिश्रम ...
तुमसर : कोरोनाच्या संकटात
सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या भीतीने घाबरलेला असताना डॉक्टरांनी मात्र स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अविरत परिश्रम व निस्वार्थ त्यागाने कोरोनाच्या रुग्णाला मायेचा आधार दिले तर आहेच, त्याच बरोबर
कोविडच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा साठा कमी असल्याने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरात डॉक्टरानी चक्क रक्तदानच करून डॉक्टर दिवस साजरा केला
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर आयोजन येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर संघ यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आले एकीकडे कोविड -१९ महामारीच्या लढ्यात रुग्णसेवेचा वसा डॉक्टरांनी या अवघड काळात कसोशीने जपला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी साप्ताहिक सुट्टी वगळता सलग ११० दिवस सुट्टी न घेता, परिवाराची चिंता न बाळगता अथकपणे डॉक्टर सेवा तर ते देत आहेत, त्याच बरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्याचा लक्षात घेता रक्तसाठा कमी झाल्याने डॉक्टरांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या रक्तदान शिबिराला आमदार राजू कारेमोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे, प्रदीप अग्रवाल, दीपक लुटे, सल्लागार व संयोजक मनोज राखडे उपस्थित होते.
शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन बाळबुधे, डॉ.पल्लवी मिसुरकर, डॉ.अनुप कोरडे, डॉ. प्रसाद कारेमोरे, डॉ. आकाश तोडशाम, डॉ. नितीन मिसुरकर,
डॉ.सुमित चकोले, सुषमा धांडे, मनोज राखडे, रवी बाळबुधे, निखिल राखडे, मनोज मोटघरे, संदीप डोये, गणेश कारेमोरे, मोरेश्वर साठवणे, अविलाश फुले, सौरभ देशमुख, रोहित शेंडे, महेंद्र अतकरी, योगेंद्र नेमा, विरेंद्र गौरकर, प्रमोद लुटे, हितेश कंगाले, सचिन गिरीपुंजे, प्रशांत जांभूळकर या २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.