जातीय सलोखा राखून उत्सव साजरे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:03 AM2018-09-13T01:03:37+5:302018-09-13T01:03:50+5:30
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश उत्सव मंडळांनी पूर्वतयारी केलेली सण उत्सव साजरा करणे ही आपली परंपरा आहे. उत्सव साजरा करताना शिस्त पाळणे, ध्वनी, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, ......
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश उत्सव मंडळांनी पूर्वतयारी केलेली सण उत्सव साजरा करणे ही आपली परंपरा आहे. उत्सव साजरा करताना शिस्त पाळणे, ध्वनी, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, श्री गणेश मुर्तीची सुरक्षीत ठिकाणी स्थापना करणे व विसर्जन मिरवणुकीचा ठरवलेला रस्ता न बदलने हे सर्व करीत असताना जातीय सलोखा राखून उत्सव साजरा करा, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मि नांदेकडकर यांनी केले.
गांधी भवन पवनी येथे पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता समिती सभेच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर मार्गदर्शन करीत होत्या.
ध्वनी प्रदूषण जनजागृती अंतर्गत त्यांनी ध्वनी प्रदूषणामुळे कर्णबधीरता, उच्च रक्तदाब, निद्रानाश, माणसिक तणाव व डोकेदुखी असा त्रास नागरिकांना होत असतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, नायब तहसिलदार कांबळे, महिला दक्षता समिती सदस्य सुनंदा मुंडले, परवीन बानो, पत्रकार डॉ. भागवत आकरे, व्यासपिठावर उपस्थित होते.
सभेला शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रीकृष्ण शिवणकर व आभार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी मानले. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.