होळी पेटवून नव्हे, वृक्ष पूजनाने साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:30 PM2019-03-19T21:30:34+5:302019-03-19T21:31:42+5:30

वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.

Celebrate Holi and not celebrate Holi | होळी पेटवून नव्हे, वृक्ष पूजनाने साजरी करा

होळी पेटवून नव्हे, वृक्ष पूजनाने साजरी करा

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींचे आवाहन : होळीमध्ये जळतात हजारो टन लाकडे, होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांचे दहन करा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वृक्षतोडीमुळे आधीच वृक्षांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की होळीसाठी भविष्यात लाकुडच मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता होळी पेटवून नव्हे तर वृक्ष पूजनाने होळी साजरी करण्याची गरज आहे. पर्यावरण पुरक होळी साजरी करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. होळी पेटवायचीच असेल तर केरकचऱ्यांची होळी पेटवून स्वच्छतेचा जागर करण्याची आवश्यकत आहे.
भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात होळीच्या दिवशी लाकडे गोळा करून त्याचे दहन केले जाते. दरवर्षी होळीमध्ये हजारो टन लाकडांची आहुती दिली जाते. सण उत्सव साजरे करण्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र अशा सण उत्सवातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. यातून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि वृक्ष जतन करण्याचा संदेश जाईल. अलीकडे होळीच्या दिवशी वृक्ष पूजनाची एक चांगली परंपरा पर्यावरण प्रेमींनी सुरु केली आहे. होळी न पेटविता एखाद्या वृक्षाचे पूजन करून त्याठिकाणी होळी साजरी केली जाते. होळी साजरी करायची असल्यास शक्यतो लहान करावी. कमीत कमी लाकडांचा उपयोग करावा, अनावश्यक वस्तूंची व पालापाचोळ्यांची होळी करावी. ज्यातून वृक्ष वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल. यासाठी गरज आहे ती पर्यावरण प्रेमींना पुढे येण्याची. पर्यावरणप्रेमींनी जनजागृती केली तर होळी ही पर्यावरण पूरक होण्यास वेळ लागणार नाही.
जिल्ह्यात पेटणार २७९४ ठिकाणी होळी
रंगांचा सण असलेला होळी हा सण २० मार्च रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७९४ ठिकाणी होळी पेटविली जाणार असल्याची माहिती आहे. त्यात १८६७ ठिकाणी सार्वजनिक तर ९२७ ठिकाणी वैयक्तिक होळी पेटविली जाणार आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास एका वेळी १०० किलो लाकडे धरली तरी हजारो क्विंटल लाकडे एका दिवसात भस्मसात होणार आहेत. त्यामुळे गावागावातील नागरिकांनी कमीत कमी लाकडांचा वापर करणे गरजेचे आहे.
बंदोबस्तासाठी दीड हजार पोलीस
जिल्ह्यात होळी सणानिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. होळीत गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरही पोलीस दल तयार राहणार आहेत. पोलीस अधीक्षकांसह दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५० उपनिरीक्षक, १०६१ पोलीस कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात राहणार आहे. तसेच ४०० गृहरक्षक दलाचे जवानही तैनात राहणार आहेत.
रासायनिक रंग टाळा
धुळवळ साजरी करताना रासायनिक रंग वापरणे टाळा. हे रंग आरोग्यसाठी घातक असतात. नैसर्गिक रंगाचा वापर करून पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करून आनंद लुटता येतो.
गवराळात पेटते केरकचऱ्याची होळी
विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे गत २६ वर्षांपासून लाकडाऐवजी केरकचरा दहन करण्याची परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे. या गावात किसनबाबा अवसरे महाराजांचे वास्तव्य होते. हनुमान मंदिरात त्यांचा निवास होता. श्रमदानातून त्यांनी मंदिराचे बांधकाम केले. परिसरात ते प्रसिद्ध होते. श्रमप्रतिष्ठेला चालना देणाऱ्या किसनबाबाचे १९ मार्च १९९२ रोजी होळीच्या दिवशी देहावसान झाले. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. त्याचवेळी गावकºयांनी होळी साजरा न करण्याचा निर्णय घेतला. सर्वत्र रंगांची उधळण होत असताना गवराळात मात्र किसनबाबा अवसरे यांच्या स्मृतीत त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला जातो. यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा केला जातो.

Web Title: Celebrate Holi and not celebrate Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.