शांततेने उत्सव साजरे करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:10 AM2017-08-21T00:10:49+5:302017-08-21T00:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : उत्सव साजरे करताना कोणालाही त्रास होणार याची दक्षता घ्यावी, बंधुत्व भावाने सर्व धर्माच्या लोकांनी उत्सव साजरे करावे व डिजेचा वापर करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी मोहाडी येथे आयोजित जातीय सलोखा समिती संमेलनात व्यक्त केले.
जातीय सलोखा व शांतता समितीचे संमेलन पोलीस स्टेशन मोहाडीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक विनिता साहू या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड, नायब तहसीलदार सुरेश मलेवार, नगरपंचायत मुख्याधिकारी स्नेहा करपे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मोहाडी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी येणाºया पोळा, गणपती, ईद या सणात सर्व धर्मातील लोकांनी बंधूभाव कायम ठेवावा. सण उत्सव साजरे करताना दुसºयांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मिरवणूक काढताना डिजेचा वापर अजिबात करू नये, असामाजिक तत्वांना हाकलून लावावे, असे आवाहन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक ठाणेदार जगदीश गायकवाड यांनी केले. संचालन यशवंत थोटे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वाकलकर, जगन्नाथ गिरीपुंजे, मिथून चांदेवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गणेश उत्सव मंडळाचे सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, डिजे साऊंड संचालक, शांतता समिती सदस्य, मंदिर, मस्जिद पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते.