पवनी येथे पत्रकार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:01+5:302021-01-08T05:56:01+5:30
ज्येष्ठ पत्रकार ब्रह्मदास बागडे यांनी पत्रकार दिनाच्या संबंधाने विचार व्यक्त केले. प्रेमचंद सूर्यवंशी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर ...
ज्येष्ठ पत्रकार ब्रह्मदास बागडे यांनी पत्रकार दिनाच्या संबंधाने विचार व्यक्त केले. प्रेमचंद सूर्यवंशी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संपादक मनोहर मेश्राम यांनी पत्रकारांनी निर्भयपणे कार्य करावे, शासनाने पत्रकारांना आवश्यक त्या सोयी सवलती व संरक्षण त्यांना प्रदान करावे असे विचार व्यक्त केले. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यावेळी दर्पण वर्तमानपत्र काढून समाजप्रबोधन करुन जनजागृती केली याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शासनाने पत्रकारांना शासनाच्या विविध समितीवर प्रतिनिधी नियुक्त करावे. शासनाच्या विविध योजनांची माहिती शासनाच्या संबंधित विभागाकडून पत्रकारांना पुरवली जात नाही ही खेदजनक बाब आहे. ग्रामीण भागातील पत्रकार खऱ्या अर्थाने श्रमिक पत्रकार आहे याचा आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भागवत आकरे यांनी पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेचा वापर समाज प्रबोधनाकरीता करावा तसेच समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडावी पत्रकारांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले कार्य करावे असे आवाहन केले. संचालन प्रकाश पचारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी केले यावेळी एल. एन. काटेखाये, राजेश येलशेटीवार, प्रदीप घाडगे, उपस्थित होते.