पालखी व शोभायात्रा काढून सावित्रीबाई फुले जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:25+5:302021-01-08T05:55:25+5:30

लाखांदूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गावात पालखी व शोभायात्रा काढून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सदर उत्सव ४ ...

Celebrate Savitribai Phule Jayanti by removing the palanquin and procession | पालखी व शोभायात्रा काढून सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पालखी व शोभायात्रा काढून सावित्रीबाई फुले जयंती साजरी

googlenewsNext

लाखांदूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गावात पालखी व शोभायात्रा काढून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सदर उत्सव ४ जानेवारीला लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. कुडेगाव येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्या ८व्या वर्षानिमित्त आयोजित या जयंती उत्सवांतर्गत सकाळच्या सुमारास गावात पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत गावातील बहुसंख्य महिला पुरुष व नागरिक उपस्थित होते. यावेळी भजन, दिंडी व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगौरवावर आधारित गीतगायनाने संबंध गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला मधुकर कांबळी महाराज, जीवन मिसार महाराज, शामराव देशकर, माजी पं. स. उपसभापती शिवाजी देशकर, माजी तंमुस अध्यक्ष छगन ब्राम्हणकर,उपसरपंच कुंजिलाल उप्रिकर, दादाजी राऊत, हिरालाल राऊत यासह कुडेगाव व मान्देड येथील बहुसंख्य माळी समाजबांधव व गावकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा समारोप येथील सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून महाप्रसाद वितरणाने करण्यात आला.

Web Title: Celebrate Savitribai Phule Jayanti by removing the palanquin and procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.