मनोरुग्णाचा वाढदिवस साजरा करून दिला माणुसकीचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:34 AM2021-09-13T04:34:03+5:302021-09-13T04:34:03+5:30

पवनी येथील मनोरुग्ण गणेश हा पवनी लोकमंगल बँकजवळील परिसरात राहतो. तसेच इतर ठिकाणी फिरत असतो. योगायोगाने गणेशचतुर्थीच्या दिवशीच गणेशचा ...

Celebrated the birthday of a psychiatrist and introduced humanity | मनोरुग्णाचा वाढदिवस साजरा करून दिला माणुसकीचा परिचय

मनोरुग्णाचा वाढदिवस साजरा करून दिला माणुसकीचा परिचय

Next

पवनी येथील मनोरुग्ण गणेश हा पवनी लोकमंगल बँकजवळील परिसरात राहतो. तसेच इतर ठिकाणी फिरत असतो. योगायोगाने गणेशचतुर्थीच्या दिवशीच गणेशचा वाढदिवस होता. गणेशचे जन्मगाव पवनीच असून त्याची दहा वर्षापूर्वी मानसिक स्थिती ढासळली. गणेश चतुर्थी आणि गणेश याच्या वाढदिवसाचा योगायोग साधून परिसरातील भाजपचे कार्यकर्ते मयूर रेवतकर यांनी गणेशचा वाढदिवस सर्वसामान्य माणसासारखा साजरा करावा अशी कल्पना मांडली. त्यांच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मंगेश भोगे, गुड्डू बावनकर, राजू खंदाडे, शारिक शेख, विलास गिरेपुंजे, सतीश पचारे, नारायण वैद्य, शेखर नागपूरे,अमोल क्षीरसागर यांनी सहकार्य केले. मयूर रेवकर यांचा भोजनावडीचा व्यवसाय असल्यामुळे ते नेहमीच त्याला भोजन देत असतात. परंतु काल त्यांना विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली. गणेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Web Title: Celebrated the birthday of a psychiatrist and introduced humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.