रमजान ईद उत्साहात साजरी
By Admin | Published: July 8, 2016 12:35 AM2016-07-08T00:35:23+5:302016-07-08T00:35:23+5:30
मुस्लिम धर्मियांमध्ये अंत्यत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा २९ दिवसानंतर शेवट आज गुरूवारला झाला.
पावसाची हजेरी : नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा
भंडारा/जवाहरनगर : मुस्लिम धर्मियांमध्ये अंत्यत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा २९ दिवसानंतर शेवट आज गुरूवारला झाला. सकाळीच मशिदीमध्ये नमाज पठण करून एकमेकांना आलिंग्न देत शुभेच्छा दिल्या. रमजान ईदनिमित्त जिल्ह्यातील मशिदीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जिल्ह्यात ५२ ठिकाणी नमाजाचे पठण करण्यात आले.
ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी चंद्रदर्शन झाले नाही. परिणामी चंद्रदर्शनानंतर गुरूवारी ईद साजरी करण्यात आली. यादरम्यान ईदनिमित्त शहरातील बाजारपेठ सजली होती. सुका मेवा विकणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. याशिवाय रेडीमेड कापड्यांच्या दुकानांमध्ये झुंबड होती.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिीकोनातून पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यात १७ पोलीस ठाणी असून सर्वांना सुरक्षेबाबत सतर्क करण्यात आले आहे
जवाहरनगर येथे सकाळी ९.४५ वाजता नमाजपठणाला सुरूवात झाली. ठाणा पेट्रोलपंप, गोवारी, सावरी, जवाहरनगर येथील बांधव हनफी सुन्नी जामा मस्जीद ठाणा पेट्रोलपंप येथे एकत्रित जमले. यावेळी मस्जीदचे हापीज मोहम्मद जुल्फकार रजा यांनी रोजा कशासाठी पाळला जातो. याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ठाणेदार राजेंद्र नागरे यांनी मौलावी यांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्र्रसंगी आदील सय्यद अली, नयंन पठाण, इरफान छवारे, नैसाद शेख, अभरार शेख, नदीम पठाण, अस्माल शेख, असरार शेख, अकबर छवारे, हनफी सुन्नी, जामा मस्जीद ठाणाचे सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी/वार्ताहर)