शास्त्री विद्यालयात गुरू पौर्णिमा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:10+5:302021-07-24T04:21:10+5:30
भंडारा : स्थानिक लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरू पौर्णिमेचा व लोकमान्य टिकळ जयंतीचा कार्यक्रम अत्यंत ...
भंडारा : स्थानिक लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरू पौर्णिमेचा व लोकमान्य टिकळ जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामूजी शहारे यांनी औचित्यपूर्ण भाषणात शिक्षकांना मार्गदर्शनात आपल्या गुरूचे स्मरण करा, हेच खरे गुरुवंदन आहे, असे उद्गार काढले. पुढे ते म्हणाले, ‘शिक्षकांकडून समाजाच्या फार अपेक्षा असतात. गुरू म्हणून शिक्षकांची प्रतिमा जपताना व समाजाच्या अपेक्षा पूर्ण करताना प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करत राहावे. विद्यार्थी घडवावेत.’ शाळेच्या प्राचार्या केशर बोकडे यांना पुष्पगुच्छ श्रीफळ व सर्व शिक्षकांना मिठाई देऊन सर्व गुरुजनांप्रती त्यांनी आदरभाव व्यक्त केला. विद्यालयाच्या दालनात प्राचार्या केशर बोकडे यांनी लोकमान्य टिळक व माता सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. माध्यमिक विभागप्रमुख शालिकराम ढवळे, शिक्षक प्रतिनिधी नामदेव साठवणे, ज्येष्ठ शिक्षिका शारदा साखरकर, माजी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिंगाडे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता दहावीकडून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन वर्ग शिक्षक योगिता कापगते, पांडुरंग कोळवते, सुनील खिलोटे, रेखा साठवणे यांनी केले. मान्यवरांची यथोचित भाषणे यावेळी झाली. संचालन पांडुरंग कोळवते यांनी केले, तर आभार क्रीडा शिक्षक सुनील खिलोटे यांनी मानले.