साहुली-संगम पांदण रस्त्याचा सिमेंट पूल जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:03+5:302021-06-18T04:25:03+5:30

भंडारा तालुक्याच्या पश्चिम दिशेला वैनगंगा व कन्हान नदीच्या संगमावर वसलेले चार गावे, साहुली, सालेबर्डी-खैरी, संगम, पिपरी या गावातील शेतकरी ...

Cement bridge of Sahuli-Sangam Pandan road dilapidated | साहुली-संगम पांदण रस्त्याचा सिमेंट पूल जीर्ण

साहुली-संगम पांदण रस्त्याचा सिमेंट पूल जीर्ण

Next

भंडारा तालुक्याच्या पश्चिम दिशेला वैनगंगा व कन्हान नदीच्या संगमावर वसलेले चार गावे, साहुली, सालेबर्डी-खैरी, संगम, पिपरी या गावातील शेतकरी व शेतमजूर दोन हजार एकर शेती असलेल्या भागात मोठ्या संख्येने काम करण्याकरिता याच एकमेव सिमेंट पांदण रस्त्याच्या उपयोग करतात. या पुलावर शेतकरी व मजुरांचे जाणे-येणे, बैलगाडी, मोठे वाहन पुलावरून दळणवळण करत होते. पूल खचल्यामुळे या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नुकताच लागलेला आहे. शेती कामासाठी ट्रॅक्टर, बैलगाडी, बैलजोडी शेती मशागतीसाठी न्यावे लागतात. तुटलेल्या पुलावर जीवितहानी नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना फार मोठा प्रश्न पडला. शेताची कशी मशागत करावी, शेतकरी व शेतमजुरांवर फार मोठे संकट आले आहे, पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करून देण्यात यावा, अशी मागणी विजय हटवार, गुणदेव घारगडे, महादेव डोकरीमारे, बाबूराव बारई, उदाराम लांबट, गजानन कारेमोरे, विलास कारेमोरे, अनिल बाळबुधे, भाऊचंद घारगडे, बारसराम बारई, दयाल घरडे, दुर्योधन बारई, किशोर सार्वे, जितेंद्र मेश्राम, किशोर अतकरी, प्रभू अतकरी या शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Cement bridge of Sahuli-Sangam Pandan road dilapidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.