सिमेंट रस्ता बांधकामात गुणवत्तेला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:21 PM2018-06-17T22:21:13+5:302018-06-17T22:21:13+5:30
येथील नगरपंचायत अंतर्गत करण्यात येत असलेल्या सिमेंट कॉंंक्रीट रस्त्याच्या बांधकामात गैरप्रकार करून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यात गुणवत्तेला खो देण्यात येत आहे. काम सुरू करताना संबंधित विभागाच्या अभियंत्याने आपल्या देखरेखीखाली काम करून घेणे गरजेचे असताना मात्र अभियंताच कामावर येत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन कंत्राटदाराने कमी साहित्याचा वापर करून मनमर्जीने कामाला सुरुवात केली आहे. परिणामी सदर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : येथील नगरपंचायत अंतर्गत करण्यात येत असलेल्या सिमेंट कॉंंक्रीट रस्त्याच्या बांधकामात गैरप्रकार करून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यात गुणवत्तेला खो देण्यात येत आहे. काम सुरू करताना संबंधित विभागाच्या अभियंत्याने आपल्या देखरेखीखाली काम करून घेणे गरजेचे असताना मात्र अभियंताच कामावर येत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन कंत्राटदाराने कमी साहित्याचा वापर करून मनमर्जीने कामाला सुरुवात केली आहे. परिणामी सदर कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लाखांदुर येथील नगरपंचायत अंतर्गत शेष निधीतुन टि-पाँईट (शिवाजी चौक) ते नगरपंचायत कार्यालयापर्यत गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे नगर पंचायतीच्या वतीने सिमेंट काँंक्रीटचा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सदर काम जिल्ह्यातील एका मजुर सहकारी संस्थेच्या नावाने असून, प्रत्यक्ष हा काम येथील़च अतांत्रिक व्यक्ती करीत असल्याची माहीती आहे. सदर काम सुरू करतांनी संबंधित विभागाचा अभियंता यांनी आपल्या निगराणीखाली काम करून घेणे गरजेचे आहे.
मात्र संबंधित अभियंताच सदर कामाकडे ढुंकूनही न पाहता आपल्या अधिपत्याखालील अतांञिक व्यक्तीला पाठवून कामाचे ले-आऊट देत असतो. त्यानंतर कंत्राटदार याच संधीचा फायदा घेऊन मनमजीर्ने अंदाजपत्रकाला बाजूला ठेवून कमी साहित्य व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बेधडकपणे काम सुरू केलेले दिसून येत आहे. होत असलेल्या या नियमबाह्य बांधकामात नगर पंचायतीने लक्ष घालने गरजेचे असतांना मात्र त्यांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर कामाच्या गुणवत्तेवर गालबोट लागले आहे.
सदर कामाची गुणवत्ता विभागाकडून तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सदर कामाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने ठेकेदाराकडून मनमानी केली जात आहे. नगर पंचायतीला स्वतंत्र अभियंत्यांची गरज आहे.
- देवानंद नागदेवे,
नगरसेवक लाखांदुर