यूथ फाॅर सोशल जस्टिसद्वारे जनगणना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:38 AM2021-02-09T04:38:06+5:302021-02-09T04:38:06+5:30
पवनी नगरात रविवारी चौकाचौकात पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. २०२१ची जनगणना सुरू करण्यापूर्वी केंद्र शासनाने ...
पवनी नगरात रविवारी चौकाचौकात पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. २०२१ची जनगणना सुरू करण्यापूर्वी केंद्र शासनाने जनगणना पत्रकात ओबीसी प्रवर्गाची नोंद करण्यासाठी रकाना तयार करावा, अशी मागणी करणारे तसेच ओबीसी रकाना नसेल तर जनगणनेस नकार देण्यासाठी ओबीसी, व्हीजे-एनटीने तयार असावे, अशी जनजागृती पथनाट्याद्वारे गांधी चौक, आझाद चौक, महात्मा फुले चौक व नेताजी चौक येथे करण्यात आली. यावेळी जनगणनेचे फायदे व अपुरी माहिती असल्यास होणारे नुकसान याची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचवली जात आहे. यावेळी यूथ फाॅर सोशल जस्टिसची पूर्ण चमू व पवनी येथील सहकारी रमेश लोणारे, शिवम घोडीचोर, केशव बुरडे, अरविंद काकडे, लेकराम मेंढे, धर्मेंद्र नंदरधने, अशोक पारधी यावेळी उपस्थित होते.