चार गावांत उभारणार अभ्यास केंद्र

By admin | Published: June 8, 2015 01:03 AM2015-06-08T01:03:24+5:302015-06-08T01:03:24+5:30

स्पर्धेच्या युगात गरिब विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती होत आहे.

Center for study of 4 villages | चार गावांत उभारणार अभ्यास केंद्र

चार गावांत उभारणार अभ्यास केंद्र

Next

महालगाव पॅटर्नची प्रचिती : ५० लाखांचा खर्च अपेक्षित
रंजीत चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
स्पर्धेच्या युगात गरिब विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी अभ्यास केंद्राची निर्मिती होत आहे. यासाठी तुमसर पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. इमारतीच्या बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सिहोरा परिसरातील चार गावात इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे.
तालुकास्तरावर आय ए एस, आय पी एस विद्यार्थी घडविण्यासाठी ५० लाख खर्चून स्पर्धा परीक्षेची पुर्व तयारी करणारा अभ्यास केंद्र उभारण्यात आले आहे. देवेंद्र आणि रुपेश या दोघां भावडांनी तरुणात चैतन्य निर्माण केले आहे. पडक्या घरात सुरु असणारे फुले-शाहू-आंबेडकर अभ्यास केंद्राचे आज घडीला वटवृक्ष तयार झाले आहे. नि:शुल्क अभ्यास केंद्र असल्याने विद्यार्थांचे कर्तेधर्ते आहेत. या अभ्यास केंद्रातील ८४ विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाली आहेत. यामुळे हा अभ्यास केंद्र विदर्भात ओळखले आहे. यामुळे या केंद्रात ६ ते ८ विद्यार्थी आय ए एस, आय पी एस सेवेत रुजू होण्यासाठी तयारी करित आहेत. या अभ्यास केंद्रात केंद्रीय तथा राज्य लोकसेवा आयोग, पोलीस, तलाठी तथा अन्य स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी तयारी करीत आहेत. विद्यार्थ्यांत आधार देणारा सुर्योदय निर्माण करण्यासाठी तुमसर पंचायत अंतर्गत प्रथमत:च स्वतंत्ररित्या अभ्यास केंद्राना मंजुरी दिली आहे. शेष फंड या कार्यात खर्च केला जात आहे. सिहोरा, सिंदपुरी, पिंपरी चुन्ही, सोनेगाव या गावात अभ्यास केंद्राची पक्की इमारत बांधकाम केली जात आहे. सामाजीक कार्येकर्ते या अभ्यास केंद्रांना स्पर्धा परीक्षांचे पुस्तके, नियत कालीका आदी उपलब्ध करुन देणार आहेत.
महालगाव पॅटर्नच्या धर्तीवर या अभ्यास केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. यामुळे गावात वास्तव्य करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात सुरु करण्यात येणारा हा पॅटर्न तालुका स्तरावर निर्माण करण्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. खासदार आणि आमदारांच्या स्थानिक विकास निधीला विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कामी लावण्यात येणार आहे. यामुळे तुमसर तालुक्याचे नावे काना-कोपऱ्यात जाणार आहे.

Web Title: Center for study of 4 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.