केंद्र शासनाने शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:09+5:302021-02-06T05:06:09+5:30
लाखनी : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ या क्षेत्राचे माजी आमदार व ओबीसी बहुजन महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष ...
लाखनी : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ या क्षेत्राचे माजी आमदार व ओबीसी बहुजन महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष सेवकभाऊ वाघाये पाटील यांनी आंदोलनस्थळी सहभाग घेऊन आंदोलनास ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने समर्थन जाहीर केले यावेळी आंदोलनस्थळी किसान एकता मोर्चाचे नेते नरेश टीकेत यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा केली. वाघाये यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्या या न्यायसंगत असून, केंद्र सरकारने पारित केलेले अन्यायकारक कृषिबिल हे रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी भूमिका विदर्भातील समस्त शेतकऱ्यांची असून ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये या कायद्याविरोधात जनजागृती करीत आहोत . शेतकरी आंदोलनाकरिता हजारोच्या संख्येने शेतकरीबांधव समर्थन करीत आहेत. शेतकरी नेता नरेश टीकेत यांच्याशी चर्चा केल्यानंतर, अशी माहिती माजी आमदार वाघाये यांनी भ्रमणध्वनीवरून प्रतिनिधीला दिली.