अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिला दगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:49 PM2018-02-07T22:49:58+5:302018-02-07T22:50:45+5:30

अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ३५० रुपये प्रतीदिन वेतन देईल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी चार वेळा केली.

The central government will provide the anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिला दगा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिला दगा

Next
ठळक मुद्देदिलीप उटाणे : केंद्र शासनाच्या आश्वासनाची केली होळी

आॅनलाईन लोकमत
तुमसर : अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ३५० रुपये प्रतीदिन वेतन देईल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी चार वेळा केली. मात्र, केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दगा दिल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केला.
तुमसर येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष सुनंदा बडवाईक, माजी महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, वंदना बघेले, रिता लोखंडे, मंगला गभणे, कल्पना गेडाम, शारदा रामकर, सुनंदा हेडाऊ, संध्या सार्वे, रेखा चकोले, फुलन कोकोडे, शालीनी गोडबोले आदी उपस्थित होते.
यावेळी उटाणे यांनी, बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ जाहीर होईल असे वाटत होते. परंतु शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे. फक्त आश्वासनाने पोट भरत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दगा दिला. महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक महिना संप केला. मुख्यमंत्री यांनी संघटना प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यात त्यांनी सेवाज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढ, भाऊबीज भेट वाढ आदी बाबींवर चर्चा केली. मानधन वाढ १ आॅक्टोबर १७ पासून करण्यात येईल असे आश्वास दिले. परंतु आजपर्यंत आदेश काढले नसल्याचा आरोप उटाणे यांनी केला आहे.
यावेळी शुभागी रहांगडाले, प्रतिक्षा कटरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्र शासनाने दिलेल्या आश्वासनानंतरही त्यांनी त्याची पूर्तता केली नसल्याने त्याचा निषेध करून होळी केली. मदतनिस मधून सेविका झालेल्या ललीता विठोले यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मंगला देशमुख यांनी केले. तर आभार सुरेखा ठवकर यांनी मानले.
मेळाव्यासाठी इंदिरा मासूलकर, सविता सोयाम, बबिता सारंगपुरे, लक्ष्मी धुर्वे, मंदा सोलंकी, ओमलता इखार, समता सलामे, किरण गोल्हर, सुनिता गवरे, सविता ठाकरे यांच्यासह प्रत्येक गावातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य केले.

Web Title: The central government will provide the anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.