केंद्रीय पथकाची दुस-यांदा लाखांदूर तालुक्याकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:29+5:302020-12-26T04:28:29+5:30
प्राप्त माहिती नुसार , यंदाच्या खरिपात तालुक्यात जवळपास २६ हजार हे.क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती.मात्र तालुक्यातील चुलबंद ...
प्राप्त माहिती नुसार , यंदाच्या खरिपात तालुक्यात जवळपास २६ हजार हे.क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती.मात्र तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा या नद्यांना तब्बल तीनदा पूर आल्याने तालुक्यातील जवळपास८ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. दरम्यान ऑगष्ट महिन्याच्या अखेरीस आलेल्या पुराने वैनगंगा व चुलबंद नदीकाठावरील व लगतच्या एकुण १६ गावातील पिक शेती पुर्णत:नष्ट झाली होती. या परिस्थितीत त्यावेळी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय पथक तालुक्यात येवून पुरपरिस्थीतीची व नुकसानीची पहाणी करुन शासनाकडून शेतक-यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी शिफारस करण्याची अपेक्षा होती.मात्र त्यावेळी देखील सदर पथकाने तालुक्यातील पुर परिस्थीतीची व नुकसानीची दखल न घेता परस्पर दौरा रद्द केल्याने त्यावेळी देखील घोर निराशा झाली होती.
दरम्यान यावेळी पूर, तुडतुडा व परतीच्या पावसाने झालेल्या सामुहीक नुकसानीचा आढावा घेत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर केंद्रीय पथक पहाणी करुन उपाय योजना सुचविनार असे अपेक्षीत असतांना पुन्हा एकदा दौरा रद्द करण्यात आल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकुणच तब्बल दोनदा केंद्रीय पथकाने क्षतीग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीची दखल न घेता तालुक्याकडे पाठ दाखविल्याने शासन प्रशासनाच्या उदासीनते विरोधात शेतक-यात निषेध दर्शविला जात आहे.