पीकविषयक चौकशीसाठी केंद्रीय चमूचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:30 PM2018-05-18T22:30:37+5:302018-05-18T22:30:37+5:30

वातावरणातील बदल व बी-बियाणांची कमकुवत उगवम क्षमतामुळे जिल्ह्यातील गर्भाअवस्थेत हाती आलेले धान पिकावर मावा व तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी सदर पिकाच्या नुकसानीची कारणमीमांसा करण्यासाठी केंद्रीय चमू परसोडी ोथे येवून शेतकऱ्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची व्यथा चमू समक्ष मांडली.

Central team visit for crop related inquiry | पीकविषयक चौकशीसाठी केंद्रीय चमूचा दौरा

पीकविषयक चौकशीसाठी केंद्रीय चमूचा दौरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : वातावरणातील बदल व बी-बियाणांची कमकुवत उगवम क्षमतामुळे जिल्ह्यातील गर्भाअवस्थेत हाती आलेले धान पिकावर मावा व तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी सदर पिकाच्या नुकसानीची कारणमीमांसा करण्यासाठी केंद्रीय चमू परसोडी ोथे येवून शेतकऱ्याशी संवाद साधला. शेतकºयांनी पीक नुकसानीची व्यथा चमू समक्ष मांडली.
यावेळी नागपूर विभागीय महसूल आयुक्त अनुपकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, तहसिलदार संजय पवार, कृषी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, माजी सरपंच पंकज सुखदेवे, माजी उपसरपंच दर्शन फंदे, पोलीस पाटील दौलत वंजारी, ग्रामपंचायत सदस्य जिजा बावनकुडे, कल्पना मोटघरे, ज्ञानेश्वर हटवार, कुंदा हटवार, प्रणाली चव्हाण, कौशल्या हटवार, शामकला चकोले, कुलदीप कावळे, ग्रामसेवक एन बिसेन, रंगारी, मंडळ अधिकारी सोनोने, तलाठी कुमुदनी क्षिरसागर, राजेदहेगाव, ठाणा, परसोडी येथील सुजान शेतकरी उपस्थित होते.
धान व इतर पिकांचे नुकसान कशारितीने झाले. याविषयी केंद्रीय चमुनी उपस्थित शेतकºयाकडून बदवून घेतले. याप्रसंगी केंद्रीय चमुनी केंद्र व राज्य शासन मान्यता प्राप्त कंपन्याकडूनच बियाणे खरेदी करावे, कृृषी विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार बियाणांची पेरणी करावी. यदाकदाचीत खासगी कंपण्यांचे बियाणे वापरावयाचे असल्यास त्या बियानांची उगवम क्षमता व पिक विषयक विमा कृषी केंद्राकडून विचार विनिमय करावे, जेणे करून नुकसानीचे अधिक भरपाईच्या मार्ग कास्तकारांसाठी मोकळा होईल. शासन मान्यता प्राप्त बियानाचे नुकसान शासन देणार यात दुमत नाही.
सदर कास्तकारांचे पिक विषयक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नसल्याने व स्थानिक महसूल व कृषी विभागाचे आपसी ताळमेळाचा अभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
याकरिता केंद्री कृषी सचिवानी दोन्ही विभागाची कानपिचकनी केली व योग्य निर्णय देण्याचे संबंधितांना निर्देश दिले.

Web Title: Central team visit for crop related inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.