शतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा

By admin | Published: September 19, 2015 12:36 AM2015-09-19T00:36:24+5:302015-09-19T00:36:24+5:30

शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पावसाअभावी फज्जा उडालाअसून शासनाला यावर्षी ही योजना गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे.

Century tree plantation scheme | शतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा

शतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा

Next

आर्थिक भुर्दंड : फटका पावसाचा
साकोली : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पावसाअभावी फज्जा उडालाअसून शासनाला यावर्षी ही योजना गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. पावसाने दडी मारल्याने धानपिकानी माना टाकल्या आहेत. अशा स्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी निर्धारित केलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कसे पुर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महसूल आणि वनविभागाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यासाठी ६ कोटी ४४ लाख ५६ हजार वृक्षांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामध्ये वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, ग्रामविकास व जिल्हा परिषदवार कृषी विभाग व इतर विभागाचा यात समावेश आहे. हे उद्दिष्ट विभाग व जिल्हानिहाय देण्यात आले आहेत.
निसर्गाने लहरीपणा दाखविल्याने सध्या जिल्ह्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून साकारलेले नाला बंधारे, माती नाला बंधारे, यामध्ये पाणी कमी आले. त्यामुळे झाडे लावल्यानंतर ती जगण्याची शक्यता खूपच कमी आहे. पाऊस सुरु असताना झाडे लागली गेली असली तर ती काही प्रमाणात जगली असती. परंतु आता पावसाने मोठी अडचण निर्माण केली आहे.
शतकोटी योजनेचे उद्दिष्टे पूर्ण झाले तरी लावलेली झाडे जगणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाही परिस्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत राज्यात ६ कोटी ४४ लाख ५६ हजार झाडे लावण्याचे नियोजन करुन आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हानिहाय व विभागनिहाय असून पावसाळा संपण्यापूर्वी ही झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था सहकारी संस्थाचा मदतीने हे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Century tree plantation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.