अध्यक्ष रमेश डोंगरे तर उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:53 PM2018-01-15T23:53:06+5:302018-01-15T23:54:17+5:30

५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने सत्ता काबिज केली होती.

Chairman Ramesh Dongre and Vice President Vivekananda Kurzkar | अध्यक्ष रमेश डोंगरे तर उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर

अध्यक्ष रमेश डोंगरे तर उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर

Next
ठळक मुद्देभंडारा जिल्हा परिषद निवडणूक : विजयाच्या घोषणेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

आॅनलाईन लोकमत
भंडारा : ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने सत्ता काबिज केली होती. त्यावेळीही आघाडी करून सत्ता स्थापन केली होती आणि आताही आघाडी केली. आगामी अडीच वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रमेश डोंगरे हे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडणुकीसाठी सोमवारला दुपारी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेचे अयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव असलेल्या अध्यक्षपदाकरीता काँग्रेसचे रमेश डोंगरे, रेखा वासनिक व भाजपचे नेपालचंद रंगारी यांनी नामांकन दाखल केले होते. उपाध्यक्षपदाकरीता राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर, काँग्रेसचे विनायक बुरडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे व भाजपच्या निलीमा ईलमे यांनी नामांकन दाखल केले होते. दरम्यान काँग्रेसच्या रेखा वासनिक यांनी नामांकन मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे रमेश डोंगरे व भाजपचे नेपाल रंगारी यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात डोंगरे यांना ३९ मते तर रंगारी यांना १२ मते मिळाली. त्यानंतर डोंगरे यांना विजयी घोषित करण्यात आले.
उपाध्यक्षपद निवडणुकीतून विनायक बुरडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर व भाजपच्या निलीमा ईलमे यांच्यात निवडणूक झाली. कुर्झेकर यांना ३९ मते तर ईलमे यांना १२ मते मिळाली. त्यानंतर कुर्झेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. सभेला जिल्हा परिषदेचे ५२ सदस्यांसह सात पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी काम पाहिले.
अशी मिळाली काँग्रेस-भाजपला मते
५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे १५, भाजपचे १३, शिवसेना एक आणि अपक्ष चार असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रमेश डोंगरे यांना काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे १५, अपक्ष चार आणि सेनेचा एक अशी ३९ मते मिळाली. तर भाजपला १३ पैकी १२ मतांवर समाधान मानावे लागले. अडीच वर्षापूर्वीपेक्षा भाजपची आताची स्थिती काहीशी कमी झाली आहे.
महिलांच्या रुद्रावताराने दीपक मेंढे भाजपात
मागील तीन दिवसांपासून जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे व सुभाष आजबले हे नाना पटोले यांच्या संपर्कात होते. किंबहूना त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टीने दोन दिवसांपासून भ्रमणध्वनी बंद ठेऊन भाजपपासनू दूर होते. दरम्यान आज दीपक मेंढे व सुभाष आजबले हे सभागृहात दिसताच भाजपच्या महिला सदस्यांनी रुद्रावतार दाखविला. महिलांच्या आक्रमक पावित्र्याने मागील दोन दिवसांपासून भाजपापासून दूर पळणाºया दीपक मेंढे यांनी परिस्थिती ओळखून मतदानाच्या अखेरच्या क्षणात भाजपच्या गटात सहभागी होऊन भाजपकडून मतदान केले.
भाजपचे सुभाष आजबले राहिले तटस्थ
भाजपचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले हे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे या निवडणुकीत ते नाना पटोले यांच्यासोबत राहिले. भाजपचे गटनेता भालाधरे यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप बजावले. व्हीप घेऊनही सुभाष आजबले यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मतदानाच्यावेळी ते भाजप उमेदवाराला मतदान केले नाही. आजबले यांच्यावर पक्ष कोणती कारवाई करतो आणि काँग्रेस कोणती बक्षिसी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभागृहात धक्काबुक्की
या निवडणुकीत भाजपचे दोन सदस्य काँग्रेसच्या गटात सहभागी झाल्यामुळे भाजपचे संख्याबळ दोनने कमी झाले होते. सोमवारला मतदान प्रक्रियेदरम्यान हे दोन सदस्य सभागृहात सर्व सदस्यांसह एकत्र आले. यावेळी भाजपच्या महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत या दोघांना त्यांच्या भूमिकेबाबत जाब विचारला. यावेळी धक्काबुक्की केली. हे एकमेव गालबोट वगळता निवडणूक शांततेत पार पडली.
शिवसेना सदस्याची हुकली संधी
गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या जया सोनकुसरे या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेससोबत होत्या. यावेळी राष्टÑवादीकडे सभापतीपदाची मागणी केली. ही मागणी राष्ट्रवादीने क्षणार्धात धुडकावून लावल्याने सोनकुसरे यांनी काँग्रेसच्या वाघाये यांच्याशी हातमिळवणी केली. मात्र या निवडणुकीत वाघाये गटाला अध्यक्षपद न मिळाल्यामुळे सोनकुसरे यांना देऊ केलेल्या सभापतीपदाची संधी हुकली आहे.

समविचारी पक्ष आणि सदस्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत रमेश डोंगरे यांना अध्यक्ष करण्यात आले. आता राज्यात आणि देशात काँग्रेसचे सरकार आणण्याचा मानस आहे. लोकांना रयतेचे सरकार हवे आहे. त्याची ही सुरुवात आहे.
- नाना पटोले, काँग्रेस नेते
मतदान प्रक्रियेसाठी भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावले होते. जि.प. सदस्य सुभाष आजबले यांनी पक्षाचे व्हीप स्वीकारूनही पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता तटस्थ राहिले. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध पक्षविरोधी कार्यवाही करण्यात येईल.
- अरविंद भालाधरे, गटनेता भाजप जि.प. भंडारा

Web Title: Chairman Ramesh Dongre and Vice President Vivekananda Kurzkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.