डोंगरगाव येथे चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:25 PM2018-10-05T22:25:09+5:302018-10-05T22:25:52+5:30

धान पिकासाठी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. सकाळी ९ वाजतापासून शेतकरी रस्त्यावर ठिय्या देवून होते.

Chakka Jam at Dongargaon | डोंगरगाव येथे चक्का जाम

डोंगरगाव येथे चक्का जाम

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संताप : सिंचनासाठी प्रकल्पाचे पाणी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : धान पिकासाठी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. सकाळी ९ वाजतापासून शेतकरी रस्त्यावर ठिय्या देवून होते.
डोंगरगाव, धर्मापुरी परिसरातून बावनथडी प्रकल्पाचा कालवा गेला आहे. मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही. वारंवार विनंती करूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. आता तर पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाविरूद्ध रोश व्यक्त करीत डोंगरगाव येथे चक्का जाम आंदोलन केले.
या आंदोलनात ओमकार कुलरकर, खरबीचे उपसरपंच गोमासे, भिकारखेडाचे उपसरपंच लक्ष्मण बोंद्रे, बंटी मिश्रा, देवा ईलमे, शैलेश कुलरकर, आशिष कुलरकर, महेश भोंडे, लोकेश गभने, ब्रिजलाल सातपुते, दुर्गाबाई सातपुते, राधाबाई समरीत, चंद्रकला कुलरकर, शारदाबाई नान्हे, चंद्रकला परतेकी, देवका कुलरकर, लक्ष्मी खराबे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. याठिकाणी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी लावून धरत जोरदार घोषणाबाजी केली.
बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नानवटकर व उपअभियंता वाघमोडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. आंधळगावचे थानेदार निलेश सोनटक्के यांनी या ठिकाणी बंदोबस्त लावला होता.

Web Title: Chakka Jam at Dongargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.