भाजपचे चक्काजाम, काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:17+5:302021-06-27T04:23:17+5:30

ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत भाजपच्यावतीने भंडारा, पवनी, साकोली, लाखनी आणि तुमसर तालुक्यातील खापा येथे ...

Chakkajam of BJP, agitation of Congress | भाजपचे चक्काजाम, काँग्रेसचे आंदोलन

भाजपचे चक्काजाम, काँग्रेसचे आंदोलन

Next

ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत भाजपच्यावतीने भंडारा, पवनी, साकोली, लाखनी आणि तुमसर तालुक्यातील खापा येथे चक्का जाम आंदोलन केले. भंडारा येथे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तब्बल तासभर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. आंदोलनापुर्वी एक सभाही घेण्यात आली. या सभेत महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप करण्यात आला. मराठा व मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील हक्काचे आरक्षण हे सरकार वाचवू शकले नाही, असे सांगितले.

या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल तासभर ठप्प झाली होती. भाजपचे पदाधिकारी घोषणा देत होते. या आंदोलनात प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. उल्हास फडके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा महामंत्री प्रा. डॉ. हेमंत देशमुख, चैतन्य उमाळकर, प्रशांत खोब्रागडे, संजय कुंभलकर, विनोद बांते, मुन्ना पांडे, वंदना वंजारी, भगवंत चांदेवार, निशिकांत ईलमे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सोडून दिले.

तुमसर तालुक्यातील खापा येथे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात पवनी येथे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या नेतृत्वात साकोली येथे माजी आमदार राजेश काशिवार आणि लाखनी येथे भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसने आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. पवनी येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात, साकोली येथे तालुकाध्यक्ष होमराज कापगते, तुमसर येथे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे व तालुकाध्यक्ष शंकर राऊत आणि मोहाडीत तालुकाध्यक्ष राजेश हटवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

बॉक्स

जिल्हा कचेरीपुढे सरकारच्या विरोधात महाधरणे

राज्य सरकार मागासवर्गीयांचे संवैधानिक हक्क संपविण्याचे धोरण राबवित आहे. या धोरणाविरोधात भंडारा आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने शनिवारी महाधरणे आंदोलन करण्यात आले. त्रिमुर्ती चौकात सभा घेवून शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात कार्याध्यक्ष सूर्यभान हुमणे, अध्यक्ष अजाबराव चिचामे, गोपाल सेलोकर, श्यामराव नागदेवे, नरेंद्र रंगारी, आचल मेश्राम, शशिकांत भोयर, गोवर्धन कुंभरे, सोपचंद सिरसाम, विजय नंदागवळी, विनय सुदामे, रजनी वैद्य, विष्णूदास हटवार, श्याम कावळे, हरिश्चंद्र धांडेकर, डॉ. संघमित्रा कोल्हे, उमेश नंदागवळी, डॉ. देवानंद नंदागवळी, विनय सुदामे, प्रमोद वरखडे, नरेश पडोळे, प्रशांत भोयर, माधवराव कलाम, गिरीधर राऊत, विश्वजीत उके, माधवराव फसाटे, हिवराज उके, नंदिनी खराबे आदी सहभागी झाले होते. प्रास्ताविक श्यामराव नागदेवे यांनी तर संचालन शशिकांत भोयर व नरेंद्र रंगारी यांनी केले.

Web Title: Chakkajam of BJP, agitation of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.