ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर साकोलीत भाजपाचे चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:06+5:302021-06-27T04:23:06+5:30
साकोली पोलिसांनी यावेळी माजी आमदार राजेश काशिवारांसह ७० ते ८० भाजपा कार्यकर्ते व पुरुष महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली ...
साकोली पोलिसांनी यावेळी माजी आमदार राजेश काशिवारांसह ७० ते ८० भाजपा कार्यकर्ते व पुरुष महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली व पोलीस ठाणे येथे नेण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार राजेश काशिवार, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, तालुका भाजपा अध्यक्ष लखन बर्वे, भोजराम कापगते, डॉ. नेपाल रंगारी, डॉ. अजयराव तुमसरे, इंद्रायणी कापगते, रेखा भाजीपाले, धनवंता राऊत, जगन उईके, राध्येशाम मुंगमोडे, नगरसेविका रोहिणी मुंगुलमारे, मीना लांजेवार, मंगला कापगते, अनिता पोगडे, गीता बडोले, नालंदा टेंभुर्णे, लता कापगते, माहेश्वरी नेवारे, भूमिता धकाते, वर्षा परमार, शारदा लांजेवार, उषा डोंगरवार, सरपंच चतुर्भुज भानारकर, रवींद्र खंडाळकर, देवेंद्र लांजेवार, महादेव कापगते, अरुण बडोले, प्रेमकुमार गहाणे, किशोर पोगडे शहराध्यक्ष, नरेंद्र वाडीभस्मे तालुका महामंत्री, दिलीप पर्वते, जयश्री पर्वते, व्यंकटेश येवले, राजेश हेडाऊ यांसह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.