तंत्रज्ञान व बाजारपेठांच्या गरजेनुसार पीक पद्धती बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:30 AM2020-12-24T04:30:34+5:302020-12-24T04:30:34+5:30

भंडारा:- नवनविन तंत्रज्ञान, ट्रॅक्टर व कृषी औजारे कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बदलते वातावरण व बाजारपेठांच्या गरजेनुसार पीक पद्धतीत ...

Change cropping patterns according to technology and market needs | तंत्रज्ञान व बाजारपेठांच्या गरजेनुसार पीक पद्धती बदला

तंत्रज्ञान व बाजारपेठांच्या गरजेनुसार पीक पद्धती बदला

Next

भंडारा:- नवनविन तंत्रज्ञान, ट्रॅक्टर व कृषी औजारे कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बदलते वातावरण व बाजारपेठांच्या गरजेनुसार पीक पद्धतीत बदल करून भरघोष उत्पादनाचा मार्ग स्विकारावा. अनुदानावर उपलब्ध तुषार सिंचन, ठिबक सिंचन तसेच प्लास्टिक मल्चींगचा वापर करून पाण्याची बचत व तणाचा बिमोड करावा. ट्रॅक्टर कंपनीने कृषी औजारे व तंत्रज्ञानात मोठे बदल केले असून कृषी विभागामार्फत अनुदान सुद्धा दिले जाते. शेतकऱ्यांनी ३५ टक्के अनुदानावर कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग बचत गटांचे माध्यमातून उभारावे, असे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त लक्ष्मी अॅग्रो ऍजन्सी बेला येथे आयोजीत शेतकरी मेळावा व शेतकरी सन्मान कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सुरेश गणवीर, लक्ष्मी अॅग्रो एजन्सीचे संचालक विजय पारधी, सेल्समॅन अनिल सिंग, संजीवनी अंग्रोचे संचालक अंगपाल पारधी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक सुरेश गणवीर म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीत बदल करण्याची गरज आहे. आवश्यक बदलांसाठी वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांनी

घ्यावे. यावेळी त्यांनी अनेक प्रगतीशिल शेतकऱ्यांनी केलेल्या प्रगतीचे उदाहरण देवून शेतकऱ्यांना तोट्याची शेती कशी फायद्याची करावी, हे समजावून सांगितले. यावेळी ट्रॅक्टरचे प्रदर्शन करण्यात आले. संचालन व आभार प्रदर्शन विजय पारधी यांनी केले. यावेळी भंडारा, लाखनी, मोहाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बॉक्स

शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण

कोका येथील शेतकऱ्याने आंबा मोहर अधिक गळत असल्याचे सांगून उपाययोजना विचारल्या. शहापूर येथील शेतकऱ्याने फॉर्म हाऊसवरून आणलेल्या शेवग्याच्या झाडाला १५ वर्षापासून शेंगा लागत नसल्याचे सांगितले. तसेच ऊस, तूर, सोयाबीन, धान पिकावरील किड व रोगांचे आक्रमण संबंधीचे प्रश्नांवर तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व सुरेश गणवीर यांनी विविध उपाययोजना मागून शेतकऱ्यांचे समाधान केले.

बॉक्स

शेतकऱ्यांचा सन्मान व प्रमाणपत्रांचे वितरण

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन व नोंदणी झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कोटांगले, विजय पारधी, सुरेश

गणवीर यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

Web Title: Change cropping patterns according to technology and market needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.