वेळेसोबत बदलणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:47 PM2018-08-25T22:47:50+5:302018-08-25T22:48:07+5:30

वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.

Changing time with need of time | वेळेसोबत बदलणे काळाची गरज

वेळेसोबत बदलणे काळाची गरज

Next
ठळक मुद्देनिरझर कुलकर्णी : जे. एम. पटेल महाविद्यालयात ‘मॅनेजमेंट फोरम’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर इंस्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट नागपुरचे अधिष्ठाता तथा प्राध्यापक डॉ. निरझर कुलकर्णी यांनी केले.
जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील पर्ल चेंबरमध्ये व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या ‘मॅनेजमेंट फोरम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिकर, व्यवस्थापन शास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे, मॅनेजमेंट फोरमचे पदव्युत्तर विभाग अध्यक्ष प्रशांत वाघाये, पदवी विभाग अध्यक्ष रोहित मुंडाफोडे उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, व्यवस्थापनाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. चांगली कौशल्य, उत्तम संभाषण, वेळेचे महत्व, दूरदृष्टी या गोष्टी आपण स्वत:मध्ये बिंबवल्या पाहिजेत. आपल्या वाटेत अनेक अडथळे येतात ते खरं म्हणजे आपलं ज्ञान तपासण्यासाठी एक नवी संधी घेऊन आले आहेत, असा विचार करून त्याला सामोरे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या विचारकक्षा रुंदावल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी शिकणयासाठी मॅनेजमेंट फोरम हे उत्कृष्ठ व्यासपीठ आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त सर्व क्षेत्रात पुढे राहायला पाहिजे. चांगली कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. अशी कौशल्य की या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकण्यासाठी मदत करतील. असा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमने यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत माणुसमारे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातुन फोरमच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसंबधी माहिती दिली आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नव्या योजना कार्यान्वित केल्या जातील असे सांगितले.
डॉ. पणिकर म्हणाले, व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी म्हणून या फोरमचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी केला गेला पाहिजे. चांगली नोकरी अथवा उत्तम व्यवसाय थाटण्यासाठी ज्ञानासोबतच अष्टपैलु व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे. आणि ते अष्टपैलु व्यक्तिमत्व या फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घडवावे. कार्यक्रमादरम्यान फोरमचे पदाधिकारी आणि सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
संचालन विशाल हटवार यांनी तर, आभार प्रदर्शन शुभांगी गणवीर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉ. पायल पशीने, प्रा. मनीष शेंडे, प्रा. सनी सत्यपाल, प्रा. भारती बारापात्रे, प्रा. मानसी यांचे तसेच एमबीए, बीबीए, बीसीसीएच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Changing time with need of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.