चारगाव व ढोरवाडा घाट तस्करांच्या तावडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:33+5:302021-02-15T04:31:33+5:30
मोहन भोयर तुमसर: उच्च दर्जाच्या रेतीकरिता तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील चारगाव व ढो र वाडा घाट रेतीकरिता प्रसिद्ध आहे. ...
मोहन भोयर
तुमसर: उच्च दर्जाच्या रेतीकरिता तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील चारगाव व ढो र वाडा घाट रेतीकरिता प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसापासून येथे तस्करांनी नदीपात्र पोखरून नदीकाठावर मोठा रेती साठा केला आहे. महसूल प्रशासन अद्याप गप्प आहे येथे अर्थकारणाची चर्चा सुरू आहे.
तुमसर तालुका मुख्यालयापासून केवळ नऊ किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी वाहते वैनगंगेच्या काठावरील चारगाव ढोरवाडा हे गाव आहेत या दोन्ही गावाच्या वैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन सुरु आहे रेती तस्करांनी नदीकाठावर मोठा रेती साठा केलेला आहे दररोज तीस ते पस्तीस ट्रक रेतीची उचल येथून सुरू आहे परंतु महसूल प्रशासनाचे अजून इकडे लक्ष दिले नाही या सर्व प्रकरणात अर्थकारण दडल्याची चर्चा सुरू आहे.
चाररगाव व ढोरवाडा येथे वैनगंगा नदी पात्र विस्तीर्ण आहे पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात रेती साठा दोन्ही नदीपात्रात जमा झालेला आहे येथील रेती अतिशय उच्च दर्जाची असून तिला शहरांमध्ये मोठी मागणी आहे परिसरातील काही ट्रॅक्टर धारकांना हाताशी धरून रेती तस्करांनी नदीपात्रातून अवैध उत्खनन करणे सुरू केले आहे नदीकाठावर रेतीचा साठा केला जातो त्यानंतर तिथून टिप्पर मध्ये भरून रेती अन्य शहरांमध्ये नेली जाते. महसूल प्रशासनाचे स्थानी तलाठी व मंडळ अधिकारी आहेत त्यांचे लक्ष जात नाही काय हा संशोधनाचा विषय आहे ठीकठिकाणी पोलीस प्रशासनाने पोलीस चौकी उभी केली आहे परंतु तेथे ही कारवाई होताना दिसत नाही.
तुमसर तालुक्यात अजूनपर्यंत एकाही नदी घाटाचा लिलाव झाला नाही परंतु राजरोसपणे नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सर्वात सुरू आहे नदी संरक्षणाची जबाबदारी महसूल विभागाची आहे परंतु महसूल विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा असल्यानंतरही येथे कारवाई होताना दिसत नाही खनिकर्म विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाचा महसूल येथे कोट्यवधी रुपयांनी बुडत आहे पर्यावरणाचे सुद्धा मोठी हानी येथे होत आहे नदीपात्रात उत्खननामुळे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे नदीचे विद्रुपीकरण सुरू असताना संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. महसूल प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानत आहे.
तस्करांचा नेटवर्क: घाट लिलाव नसताना सर्रास नदीपात्रातून रेतीचे उत्खनन रेती तस्कर राजरोसपणे मागील अनेक महिन्यांपासून करीत आहेत मागील दीड वर्षापासून येथील नदी घाटांचे लिलाव झालेले नाहीत नदीपात्रातून रेती उत्खनन करताना सर्वसामान्यांना दिसते परंतु संबंधित विभागाला हे अजिबात दिसत नाही यामुळे रेती तस्करांचे नेटवर्क तगडे असल्याचे दिसून येते. रेती तस्करासमोर विभाग नांगी टाकताना दिसतो. जिल्हा स्तरापासून तालुका स्तरापर्यंत रेती तस्करी रोखण्यासाठी पथके तयार करण्यात आली परंतु त्या पथकांना अपयश आलेले दिसते कारवाई का होत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
राजरोसपणे शासनाच्या महसूल येथे बुडत आहे परंतु त्यांचे देणे-घेणे कुणालाच नाही दिवसा व रात्री सर्रास प्रीतीचे टिप्पर व ट्रक धावताना दिसतात परंतु कारवाई मात्र शून्य आहे यामुळे किती प्रकारचे नेटवर्क मोठे आहे की यात अर्थकारण दडले आहे हाच नेमका प्रश्न उपस्थित होतो.