चारगाव रेती घाट सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 12:28 AM2017-07-08T00:28:56+5:302017-07-08T00:31:06+5:30

तालुक्यातील चारगाव (देव्हाडी) रेती घाटातून मशीनच्या साहाय्याने रेतीची मागील काही दिवसांपासून तस्करी सुरू होती.

Chargaon sand ghat seal | चारगाव रेती घाट सील

चारगाव रेती घाट सील

Next

रेती घाटातून दोन पोकलॅन्ड मशिन जप्त : कंत्राटदाराची सुरक्षा ठेव जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील चारगाव (देव्हाडी) रेती घाटातून मशीनच्या साहाय्याने रेतीची मागील काही दिवसांपासून तस्करी सुरू होती. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी चारगाव रेती घाट सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अटी, शर्ती व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंत्राटदाराची सुरक्षा ठेव जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे रेती कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती माफीयांचे मनोबल उंचावले होते. नियम धाब्यावर बसवून रेतीची सर्रास तस्करी सुरू होती. रेतीची दररोजच्या वाढत्या उपस्यामुळे नदी पात्राचे अस्तित्व धोक्यात आले होते. चारगाव रेती घाट १ कोटी २६ लाख ७ हजार ७८६ रूपयाला लिलाव झाला होता. चारगाव वैनगंगा नदी पात्रातील गट क्रमांक ६० अंशता, ११:१६:१७ आराजी ४.५० हेक्टर रेतीघाट २०१६-१७ करीता लिलाव करण्यात आले होते. ३० सप्टेंबरपर्यंत रेती उपसा करण्याची प्रशासनाने परवानगी दिली होती. चारगाव रेतीघाटावर पहाटेपासून मशिनने नियमबाह्य रेतीचा उपसा केला जात होता. ती रेती नदी काठावर जमा करण्यात येत होती. त्यानंतर दिवसभर ट्रकने वाहतूक केली जात होती. ‘चारगाव रेती घाटावर मशीनने रेतीचे खनन’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर खनिकर्म विभाग, तुमसर तहसील कार्यालय व महसूल प्रशासनातील अधिकारी खळबळून जागे झाले होते.
त्यानंतर महसूल प्रशासनाने रेती घाटावर ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी केली. ड्रोन कॅमेऱ्यातही नदी पात्रातून मशिनने रेतीचे खणन सुरू असल्याचे दिसून आले.
नदी पात्रातून मशिनने रेती उपसा न करण्याचे स्पष्ट आदेश अटी व शर्तीत दिले असतानाही अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल विभागाने शुक्रवारला चारगाव (दे) रेतीघाट सील केले. रेतीच्या वाढत्या उपस्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले. अनेक दिवसांपासून येथे सर्रास नियमबाह्य रेती उपसा प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची गरज आहे.

चारगाव रेती घाटावरील कंत्राटदारांचे दोन पोकलॅन्ड मशीन जप्त करण्यात आल्या असून कंत्राटदाराची सुरक्षा ठेव जमा करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली.
- गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर.

Web Title: Chargaon sand ghat seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.