नागरिकांकडून शासकीय दर शुल्क आकारणी करा
By Admin | Published: June 21, 2017 12:35 AM2017-06-21T00:35:14+5:302017-06-21T00:35:14+5:30
सेंतू केंद्रात नागरिकांची व विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी फार गैरसोय होत आहे.
अधिकाऱ्यांना निवेदन : शिवसेनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सेंतू केंद्रात नागरिकांची व विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी फार गैरसोय होत आहे. सेतू केंद्रात तयार करण्यात येणाऱ्या दाखल्याकरिता लागणाऱ्या दराबाबत माहितीचे फलकांवर योग्य दर लिहून तो फलक सेतू केंद्राबाहेर लावावे जेणे करून नागरिकांना लागणाऱ्या शुल्काबाबत योग्य माहिती मिळेल.
काही दिवसाआधीच वर्ग दहावी आणि रावीचा निकाल जाहीर झाला असून लागणाऱ्या विविध दखल्यांकरिता विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सेतू केंद्राबाहेर होत असून त्यांची गैरसोय होत आहे. करिता सेतू केंद्रामध्ये संघणकाचा संख्येत वाढ करून स्त्रियांची व पुरूषांची वेग वेगळी रांग करण्यात यावे व नागरिकांना पिण्याचा पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. जेणे करून नागरिकांना योग्य सेवा मिळेल.
२६ जूनपर्यंत नागरिकांना सोय उपलब्ध करून न दिल्यास शिवसेनेचा वतीने सेतू केंद्राला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी. तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना निवेदन देतानी शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले, पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, वाहतुक सेना तालुका प्रमुख दिनेश पांडे, तालुका प्रमुख नरेश उचिबघले, कामगार सेना तालुका प्रमुख मनोहर जांगळे, शहर प्रमुख नितीन सेलोकर, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, कृपाशंकर डहरवाल, पवन खवास, प्रकाश चौधरीसह शिवसैनिक उपस्थित होते.