चेकपोस्टला खासगी लोकांचा विळखा

By admin | Published: March 21, 2016 12:32 AM2016-03-21T00:32:44+5:302016-03-21T00:32:44+5:30

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे,..

Check out the checkposts in private | चेकपोस्टला खासगी लोकांचा विळखा

चेकपोस्टला खासगी लोकांचा विळखा

Next

शासनाचा महसूल बुडतोय : वेळीच कारवाई करण्याची मागणी
सिरपूरबांध : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या बार्डर चेकपोस्ट येथे ज्या सद्भाव कंपनीला २३ वर्षाकरिता टोल वसुली करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व सदर चेकपोस्टरवर कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांच्या बेजबाबदारीमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
सदर चेकपोस्टवरून रात्रीच्या वेळी ओव्हरलोड, अधिक उंच व गाडीच्या बाजूला निघालेले माल भरलेले वाहन सरळ हाय-वेने निघताना दिसले. चेकपोस्टवर कंत्राटी वाहनचालकाने त्या गाड्यांचा पाठलाग करून छत्तीसगडच्या सीमेवर थांबविले. तसेच मोटार वाहन निरीक्षकांना बोलावले. कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे घटनास्थळी पोहचले, पण त्या गाड्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
त्यांच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाचा महसूल तर बुडतच आहे, पण कारवाई न झाल्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांची हिंमत अजून वाढतच आहे. अशा प्रकरणावर वेळीच कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून होत आहे. या प्रकरणामुळे चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या सुरक्षा गार्डाच्या जिवाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होवू शकते. तरी चेकपोस्टवर सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीने योग्य ती व्यवस्था करून होत असलेल्या प्रकरणांवर आळा घालण्याची गरज आहे.
वार्डर चेकपोस्ट सिरपूरबांध येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक हे आपल्यासोबत बाहेरील मुले घेऊन येतात. पण शासनाच्या नियमानुसार चेकपोस्टवर खासगी लोक ठेवता येत नाही. पण प्रत्येक मोटार वाहन निरीक्षक आपल्या सोबत चार ते पाच लोक घेऊन येतात. बाहेरून आलेले ते लोक हे काम पाहत असतात. जर मोटारवाहन निरीक्षकांना काम करण्याकरिता बाहेरच्या लोकांची गरज भासत असेल तर त्यांनी गावातीलच मुलांना घेऊन काम करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
बाहेरील लोकांना घेऊन काम न करता गावातील बेरोजगार युवकांना घेऊन काम करावे यासाठी ग्रामस्थांनी चेकपोस्टवर कार्यरत मोटारवाहन निरीक्षकांना विनंती केली. तसेच बाहेरील लोकांना आणून त्यांच्याकडून काम करविणे खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीसुद्धा त्यांना देण्यात आली.
रात्रीच्या वेळी पळून गेलेल्या ट्रकच्या प्रकाराबद्दल मोटार वाहन निरीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी, सदर प्रकरण गंभीर असून अशा प्रकारावर आळा घालण्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर व सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीला पत्र लिहून कळविले असल्याचे सांगीतले. (वार्ताहर)

Web Title: Check out the checkposts in private

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.