रासायनिक खतांसह, इंधनाची दरवाढ कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:39 AM2021-05-25T04:39:21+5:302021-05-25T04:39:21+5:30
दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दरात व डिझेल पंपाद्वारे सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ ...
दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दरात व डिझेल पंपाद्वारे सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे डिझेल व पेट्रोलची दरवाढ तत्काळ थांबवावी, अशी मागणी समितीने केली आहे. कोरोना या महामारीच्या संकटात शेतमालाचे व भाजीपाल्याचे भाव पडले असून, ते निम्म्यावर आले आहेत. तर खताच्या किमती दीड पटीने वाढल्यामुळे शेती व्यवसाय ठप्प आहे. आधीच खर्च भरून एवढे रास्त भाव मिळत नसल्यामुळे थकलेल्या कर्जापोटी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या मशिन्स या डिझेलवर चालतात. सध्या डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे शेती उपयोगासाठी इंधन दरवाढ शेतकऱ्यांना न परवडणारी झाली आहे. त्यामुळे डिझेल, पेट्रोल, खत यांचे दर कमी करावेत, अन्यथा तुमसर तालुका व शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन तहसीलदारांना देऊन दरवाढीचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेश सचिव प्रमोद तीतीरमारे, अरविंद कारेमोरे, बाळा ठाकूर, शिव बोरकर, नीरज गौर, करुणा धुर्वे, कान्हा बावनकर, दिनेश भवसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
240521\screenshot_20210524-164138_whatsapp.jpg
===Caption===
निवेदन देतांना काँग्रेसचे पदाधिकारी