राजनीला मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:01:03+5:30
गावाची प्रत्यक्ष पाहणी करतांना संबंधित आजाराचा प्रचार व प्रसार होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी ग्रामपंचायतसह आरोग्य प्रशासनाला उपाययोजनेचे सक्त निर्देश दिले आहेत. लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात महिण्याभरापुर्वी काही नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराने बाधित निघाले होते. या घटनेची माहिती आरोग्य प्रशासनाला होताच या गावातील डेंग्यू आजाराने बाधितांवर औषधोपचार करीत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : महिनाभरापुर्वी डेंग्यूसदृष्य आजाराने बाधित रुग्णांची प्रकृती बरी झाली असतांना व परिस्थिती नियंत्रणात असतांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून होत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी भंडारा जिल्हा परिषद मुख्यकार्यकार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी तालुक्यातील राजनी गावाला आकस्मित भेट देऊन गावाची पाहणी केली.
यावेळी गावाची प्रत्यक्ष पाहणी करतांना संबंधित आजाराचा प्रचार व प्रसार होऊ नये व परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी ग्रामपंचायतसह आरोग्य प्रशासनाला उपाययोजनेचे सक्त निर्देश दिले आहेत. लाखांदूर तालुक्यातील राजनी गावात महिण्याभरापुर्वी काही नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराने बाधित निघाले होते. या घटनेची माहिती आरोग्य प्रशासनाला होताच या गावातील डेंग्यू आजाराने बाधितांवर औषधोपचार करीत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. यावेळी आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील पाणीपुरवठा योजना व सांडपाणी वाहुन नेणाºया गटारांची स्वच्छता करण्यासह राहत्या घर परिसर व वैयक्तीक स्वच्छतेवर भर देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार या गावात ग्रामपंचायत प्रशासनाने गाव परिसरातील गटारे स्वच्छ करुन डास उत्पत्ती होऊ नये, यासाठी गावात धुरळीकरण व फवारणीदेखील केली होती. एवढेच नव्हे तर गावकऱ्यांना अधिक काळ पाणी साठवण न करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या घटनेची माहिती भंडारा जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना होताच २४ मे रोजी राजनी येथे भेट देऊन गावाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला संबंधित परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या आवश्यक उपाययोजनांची माहिती देखील जाणून घेतली. तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम, तहसिलदार संतोष महल्ले, खंडविकास अधिकारी प्रमोद वानखेडे, ग्रामसेवक एस. व्ही. खरवडे, सरपंच कविता बगमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.