मुख्यमंत्री सडक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:38 PM2018-06-05T22:38:58+5:302018-06-05T22:39:10+5:30
तालुक्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्त्याचे काम जोमाने सुरू असून, या योजने अंतर्गत पिपळगाव/को ते मडेघाट रस्त्याचे सुद्धा काम चालु आहे. मात्र या रस्त्यांच्या कामा दरम्यान खोदलेली माती शेतकऱ्यांच्या शेतात घातली गेली आहे. सद्या स्थितीत उन्हाळी पिकाची कापणी व पावसाळी पिकाच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्त्याचे काम जोमाने सुरू असून, या योजने अंतर्गत पिपळगाव/को ते मडेघाट रस्त्याचे सुद्धा काम चालु आहे. मात्र या रस्त्यांच्या कामा दरम्यान खोदलेली माती शेतकऱ्यांच्या शेतात घातली गेली आहे. सद्या स्थितीत उन्हाळी पिकाची कापणी व पावसाळी पिकाच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पिंपळगाव/को येथील शेतकऱ्यांच्या शेतात रस्त्यांच्या बांधकामावरील माती टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मशागत करण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्यात होत असलेली बहुतांश कामे एका कंञाटदाराला देण्यात आली असून, या सर्वच बांधकामांमध्ये निकृष्ठ दजार्चे बांधकाम करीत आहेत. सोमवारी खैरी/पट रस्त्याच्या निकृष्ठ बांधकामाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. प्रकाशित झालेली बातमी वाचून पिंपळगाव/को येथील शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीला भ्रमणध्वनी द्वारे माहीती दिली.
पिपळगाव/को ते मडेघाट रस्त्याच्या बांधकामात कंत्राटदाराकडून होत असलेल्या मनमानी कारभाराची माहीती दिली असता, सदर प्रतिनिधींनी पिंपळगाव/को. येथे होत असलेल्या कामाची पाहणी केली असता, बांधकामासाठी खोदलेली माती शेतकºयांच्या शेतात टाकली असल्याचे दिसून आले आहे.
शेतकºयांनी सांगितल्याप्रमाणे कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले असून, लाखांदुर तालुक्यात होत असलेली बहुतांश रस्त्यांच्या कामाचे कंत्राट त्यांना आहे. मात्र निकृष्ट बांधकाम करत काम पुर्ण करण्यास दिरंगाई केली जात आहे.
खैरी/ पट, कुडेगाव येथील कामास होत असलेल्या दिरंगाई पाठोपाठ पिंपळगाव/को ते मडेघाट येथील रस्त्याच्या कामास देखील दिरंगाई केली जात आहे. यामुळे रहदारीच्या नागरीकांची डोकेदुखी वाढली आहे.
पावसाळी पिकाच्या मशागतीच्या कामाला वेग आल्याने नांगरणी, धुºयांचे माती काम, तुरीची लागवड यासह अन्य कामे केली जात आहेत. मात्र शेतात माती टाकण्यात आल्याने शेतकºयांना शेतीची कामे करण्यास अडचण होत आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री सडक योजना शेतकºयांच्या मानगुटीवर म्हणायची वेळ आली आहे. कंत्राटदार यांच्याकडून होत असलेली दबंगगीरीमुळे रस्त्याचे बांधकाम चालू असलेल्या गावातील नागरीक ञस्त झाले असून, संबंधित अभियंते शुक्ला व कापगते यांची कंत्राटदारासोबत मिली भगत असल्याचे बोलले जात आहे.
सबंधित कंत्राटदार यांच्याकडून होत असलेला मनमानी कारभार व निकृष्ठ बांधकाम याबाबत संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून फोन उचलल्या जात नसल्याने संपर्क होत नाही. सदर कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करून कामाचे कंञाट दुसºयाला देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकºयांकडून होत आहे.